Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » नार पार प्रकल्पाच्या अगोदर गिरणेचे पाणी मन्याड धरणात व वरखेडे धरणाचे पाणी हिंगोणे पर्यंत आणून तालुका सुजलाम सुफलाम करणार – आ. मंगेश चव्हाण
    चाळीसगाव

    नार पार प्रकल्पाच्या अगोदर गिरणेचे पाणी मन्याड धरणात व वरखेडे धरणाचे पाणी हिंगोणे पर्यंत आणून तालुका सुजलाम सुफलाम करणार – आ. मंगेश चव्हाण

    editor deskBy editor deskOctober 2, 2024No Comments5 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव : प्रतिनिधी

    तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार स्वर्गीय रामभाऊ जिभाऊ पाटील यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या शेतकरी हिताच्या कार्याला आदरांजली म्हणून आमदार मंगेश चव्हाण यांनी आज दि १ ऑक्टोंबर रोजी ११ कोटी ६९ लक्ष निधीतून साकारण्यात येत असलेल्या जळगाव भव्य अश्या कृषीभवनाचे भूमिपूजन करत तालुक्यातील ५०० प्रगतिशील शेतकऱ्यांचा सपत्नीक आदर्श शेतकरी म्हणून सन्मान केला.
    यावेळी माजी आमदार साहेबराव घोडे, भाजपा जिल्हाध्यक्ष ह.भ.प.ज्ञानेश्वर जळकेकर महाराज. केळीतज्ञ – श्री. के. बी. पाटील (जैन इरिगेशन), जिल्हा कृषी अधिकारी कुर्बान तडवी, से. नि. कृषी संचालक- श्री. अनिल भोकरे, राज्य पुरस्कार प्राप्त कृषी भुषण अरुण निकम सर, बाळासाहेब राऊत (शिंदी), आर.के.पाटील (शिरसगाव), भगवान परदेशी (जामडी), सौ.सिमा धनंजय पाटील (पिंप्री प्रदे), आशिषकुमार पटेल (चाळीसगाव), नाना पाटील (दडपिंप्री), उपविभागीय कृषी अधिकारी रमेश जाधव, तालुका कृषी अधिकारी संजय चव्हाण, PWD चे बैसाणे साहेब, माजी पं.स. उपसभापती आनंदा अण्णा पाटील, मार्केट सभापती मच्छिंद्र राठोड, उपसभापती वत्सलाताई पाटील, माजी पंचायत समिती सभापती संजू तात्या पाटील, भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा सौ. देवयानीताई ठाकरे, के.बी.दादा साळुंखे, पोपट तात्या भोळे, प्रा.सुनील निकम सर, धर्माआबा वाघ, आनंदजी खरात, संजु आबा पाटील, सरदारशेठ राजपूत, मार्केट संचालक रवी आबा पाटील, रवींद्रआबा पाटील, कपिलदादा पाटील, शैलेंद्र पाटील, नवलदादा पवार, प्रदीप पाटील, निलेश वाणी, विजयाताई पवार, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष विजय पाटील, धनंजय आप्पा मांडोळे, सुरेश महाराज, पैलवान नथ्थु चौधरी, रयत सेना अध्यक्ष गणेश दादा पवार, मोहिनी ताई गायकवाड, सुलभाताई पवार, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील व सर्व तालुका टिम उपस्थित होते.

    तत्पूर्वी शेतकऱ्यांची चाळीसगाव शहरातून बैलगाडीवरून मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात सम्राट बळीराजा, छत्रपती शिवाजी महाराज, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक, स्व.रामराव जिभाऊ पाटील यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

    भाजपा व भाजपा किसान मोर्चा तर्फे आयोजित या कार्यक्रमात तालुक्याचे भाग्यविधाता म्हणून ओळख असलेले कर्तृत्ववान आमदार स्वर्गीय रामभाऊ जिभाऊ पाटील यांच्या पावलांवर पाऊल ठेवत छोटासा कार्यकर्ता म्हणून मार्गक्रमण करत शेतकरी हितासाठी एक भव्य असे कृषीभवन निर्माण करण्यासाठी भूमिपूजनाचा कार्यक्रम करत त्यांना आदरांजली आमदार मंगेश चव्हाण यांनी वाहिली तसेच पारंपरिक शेती कडून तंत्रज्ञान युक्त शेतीकडे वळून, शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या हातांना बळकटी मिळते, ती मागे सुखदुःखात सक्षमपणे उभे असलेल्या जोडीदाराची या जोडीदाराच्या साथीने प्रगतिशील शेतकरी ठरलेल्या ५०० शेतकऱ्यांचा सपत्नीक आदर्श शेतकरी म्हणून सन्मान देखील या वेळी करण्यात आला.

    भव्य दिव्य अश्या या सोहळ्यात हजारोच्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते. यावेळी आमदार चव्हाण यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की हे कृषी भवन शेतकऱ्यांचे आधुनिक मंदिर असणार आहे. यातून शेतीविषयक अनेक समस्यांचे मार्गदर्शन,विविध शासकीय योजनांची माहिती व लाभ तर त्यांना मिळेलच पण एखाद्या फाईव स्टार हॉटेल ला आल्यासारखे प्रतीत होईल. सर्व सुखसोयी युक्त असे हे शेतकऱ्यांसाठी असणारे प्रशासकीय दालन असणार आहे. शेतकऱ्यांच्या नावावर बोलण सोप असत पण काम करायची वेळ आल्यावर परिस्थिती अवघड असते. आता काही दिवसांपूर्वी काही लोक पाण्यात जाऊन बसले होते. त्यांनी १० वर्षात काय दिवे लावले हे तालुक्याला माहीत आहे आणि त्यांचे आरोप होते की गिरणेचा उगम कोठे? मण्याड कस भरते? तितूर कशी वाहते? हे लोकप्रतिनिधीला माहिती नाही, अश्या बोलबच्चन लोकांना कृतीतून उत्तर देतो की, ४ दशकांपासून प्रलंबित नारपार गिरणा नदीजोड योजनेचे टेंडर काढून लवकरच काम सुरु होत आहे, पहिल्या टप्प्यात ३ हजार ५०० कोटींचा खर्च करण्यास सरकार तयार असून प्रकल्पास ५ वर्षांचा कालावधी लागणार आहे, मात्र नारपार चे पाणी गिरणात येण्याच्या अगोदर गिरणेचे पाणी मण्याड धरणात आणणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली, यासाठी राज्य शासनाकडे १३० कोटींचा प्रस्ताव दिला असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच वरखेडे धरणाच्या बंदिस्त पाटचारीचे काम सुरु झाले असून येत्या १८ महिन्यात उंबरखेड, भोरस पासून ते वाघळी – हिंगोणे पर्यंत २० गावांच्या शेतात पाणी आणायचा माझा संकल्प आहे. मागेल त्याला विहीर या योजनेत १०० कोटींच्या २००० नवीन विहिरी विहिरींना येत्या आठ दिवसात प्रशासकीय मान्यता देण्यात येणार आहे यामुळे तालुका सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. जो पर्यंत शासन स्तरावर कागद जात नाही.मी खोटं आश्वासन देत नाही. ज्या दिवशी भूमिपूजन त्याच दिवशी लोकार्पणाची वेळ लोकांना कळते. मला लोकांच्या भावनांशी खेळ कधीही जमला नाही, जे बोलतो तेच करतो साडेचार वर्षात असा एक तरी शब्द दाखवा जो मी दिला आणि पूर्ण केला नाही आणि मला फक्त आणि फक्त आपल्या आशीर्वादाची गरज असून बाकी तुमच्याकडून मला काही अपेक्षा नाही.तालुक्यातील प्रत्येक शेतकरी,कष्टकरी व सामान्य माणूस मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो माझ्यासाठी माननीय आहे.
    कार्यक्रमातविशेष मार्गदर्शक म्हणून उपस्थित असणारे केळी तज्ञ के बी पाटील व सेवानिवृत्त प्रकल्प संचालक आत्मा श्री. अनिल भोकरे यांनी शेती विषयक अनमोल असे मार्गदर्शन शेतकऱ्यांना केले.

    एकाच वर्षात चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना ३०० कोटींची मदत

    जळगाव जिल्ह्यात मागील वर्षी भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती, यात शासनाच्या वतीने केवळ चाळीसगाव तालुक्याचा दुष्काळी अनुदान मिळण्यासाठी समावेश करण्यात चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांना यश मिळाले होते. त्यानंतर पीकविमा व कापूस अनुदान माध्यमातून आतापर्यंत ३०० कोटींची मदत मागील खरीप हंगामात चाळीसगाव तालुक्याला मिळाली असल्याची माहिती आमदार चव्हाण यांनी मनोगतात दिली.
    १) खरीप हंगाम २०२३ – १३३ कोटी (८३ हजार शेतकरी)
    २) खरीप हंगाम २०२३ पीकविमा – २५ टक्के आग्रीम – २५ कोटी (५७ शेतकरी)
    ३) खरीप हंगाम २०२३ उंबरठा उत्पन्न आधारित पीकविमा – ११२ कोटी (५७ हजार)
    ४) कापूस अनुदान – ३० कोटी (७६ हजार शेतकरी)

    या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी तसेच भाजपा किसान मोर्चा तर्फे करण्यात आले होते, सोबतच तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे देखील सहकार्य लाभले. यावेळी तालुक्यातून उपस्थित हजारो शेतकरी बांधवाना स्नेहभोजनाची देखील व्यवस्था करण्यात आली होती.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    शेगाव दर्शनाचा फायदा घेत घरफोडी; जळगावात सोन्या-चांदीसह रोख रक्कम लंपास

    January 29, 2026

    महाराष्ट्र पोरका झाला; अजित पवारांना अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर

    January 29, 2026

    दोन-अडीच लाखांच्या कर्जाने घेतला जीव; शेतकरी आत्महत्येने हळहळ

    January 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.