कलकत्ता वृत्तसंस्था । देशात एकीकडे मुलगी झाली म्हणून आनंदोत्सव साजरा करण्यात येतो. पण दुसरी कडे मुलगी झाली म्हणून विवाहितेचा छळ केला जातो. पश्चिम बंगालमध्ये याही पलिकडे घटना घडून क्रुरतेचा कळस गाठला आहे. मुलाला जन्म न दिल्यामुळे नवऱ्यानेच पत्नीच्या गुप्तांगात लोखंडी रॉड घातल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे.
यावर प्रायव्हेट पार्ट्समध्ये लोखंडी रॉड खुपसून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप पत्नीने केला आहे.
पूर्व वर्धमानमधील कालना पोलीस स्टेशन हद्दीतील बागनापारा येथील बिजारा भागातील आहे. एका महिलेसोबत घरगुती हिंसाचाराची अंगावर काटे आणणारी घटना समोर आली आहे. मुलगा न झाल्यामुळे पतीने पत्नीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड घुसवल्याचा आरोप आहे. महिलेला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. त्याचवेळी पोलिसांनी आरोपी पती तौफीक शेख याला अटक करून रविवारी कालना उपविभागीय न्यायालयात हजर केले.
कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलेला आधी दोन्ही मुलीच आहेत. दुसरी मुलगी झाल्यापासून तिचा छळ केला जात होता. पती गुप्तांगात लोखंडी रॉड घालून अत्याचार करत असे, असा आरोप पीडितेने केला आहे.
गुप्तांगात रॉड घुसवल्याचा प्रकार घडल्यानंतर पीडितेच्या नातेवाईकांनी शनिवारी तिचे सासरचे घर गाठले आणि तिला कालना उपविभागीय रुग्णालयात दाखल केले. पीडितेचे वडील भुलू शेख यांनी सांगितले की, आपल्या मुलीवर अत्याचार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही तिला सासरच्या घरातून कसेबसे सोडवले आणि रुग्णालयात दाखल केले. यानंतर या प्रकरणाची कालना पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. दुसरीकडे, पीडितेची सासू रेणुका शेख हिने सर्व आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे.