• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला तिळवण तेली समाज सभागृहासाठी २६ लाखाचा निधी

editor desk by editor desk
October 2, 2024
in जळगाव, धरणगाव
0
शिवसेनेनं चुकीचा अर्थ काढून केलेले आंदोलन अयोग्य: गुलाबराव पाटील

धरणगाव ; प्रतिनिधी

येथील तिळवण तेली पंच मंडळी, सुभाष दरवाजा तेली मढीच्या जागेवर भव्य-अत्याधुनिक सर्व सुविधांनीयुक्त सभागृह बांधण्यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी २६ लाखांचा निधी मंजूर केला आहे. संबधीत कामाची प्रशासकीय मान्यता मंजूर झाली असून तेली समाज मंडळाचे सभागृहाचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. या कामासाठी तेली समाजाचे पंच मंडळ आणि समाज बांधवांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतली होती.

धरणगाव नगरपरिषद हद्दीतील सिटीएस क्रमांक १४२ अ आणि सिटीएस क्रमांक १४२ ब जागेवर ( खालचा मजला व पहिला मजला) तेली समाज पंच मंडळासाठी बहुउद्देशीय सभागृहाचे बांधकाम प्रलंबित होते. ते करण्यासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर) योजना अंतर्गत नुकतेच प्रशासकिय मान्यता आदेश प्राप्त झाले असून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जा.क्र. नप / नियोजन / नगरोत्थान योजना / १५/२०२४ दिनांक ३०/०९/२०२४ च्या पत्रानुसार नगर विकास शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांनी प्रशासकिय मंजूरी दिली आहे. या कामासाठी २५ लाख ६० हजार ९९९ रूपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच कामाला प्रारंभ होणार आहे.

तिळवण तेली समाज मंडळाच्या पंच मंडळींनी काही दिवसांपूर्वी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी ना. पाटील यांना प्रस्तावित बहुउद्देशीय सभागृहाची गरज पटवून दिली होती. संबधीत सभागृह हे दुमजली होणार असून तळमजल्यावर पंचमंडळीचे सभागृह आणि वरच्या मजल्यावर विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, वाचनालय, सभागृह अपेक्षित आहे. समाजाची गरज आणि निकड ओळखून पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी तात्काळ निधी उपलब्ध करुन दिल्याने समाजात आनंद, उत्साहाची लहर निर्माण झाली आहे. पंचमंडळीने यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहेत.

Previous Post

मारहाण करीत डोक्यात दगड टाकून तरुणाचा खून : चोपडा तालुक्यात घडली घटना !

Next Post

आमदार राजूमामा भोळे चषक अंतर्गत ४ थी राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धा उत्साहात

Next Post
आमदार राजूमामा भोळे चषक अंतर्गत ४ थी राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धा उत्साहात

आमदार राजूमामा भोळे चषक अंतर्गत ४ थी राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धा उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group