Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » खळबळजनक : पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा दुर्देवी मृत्यू
    क्राईम

    खळबळजनक : पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा दुर्देवी मृत्यू

    editor deskBy editor deskOctober 2, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे : वृत्तसंस्था

    राज्यातील अनेक शहरात पावसाचे वातावरण असतांना पुणे शहरातील आज सकाळी हेलिकॉप्टर कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. धुक्यामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्या पुणे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील बावधन बुद्रुक परिसरात हेलिकॉप्टर कोसळले आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात धुक्याची चादर पसरली आहे. या धुक्यामुळेच हेलिकॉप्टर कोसळले असावे, असा प्राथमिक अंदाज लावला जात आहे. या घटनेचा एक व्हि़डीओही समोर आला आहे. पुण्यातील ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरुन या हेलिकॉप्टरने सकाळी साडेसात वाजता उड्डाण घेतलं होतं. हे उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या तीन मिनिटात या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्ट आणि एचईएमआरएल ही या केंद्र सरकारच्या संस्थेदरम्यान असलेल्या डोंगराळ भागात हेलिकॉप्टरला अपघात झाला.

    या व्हिडीओत पुण्यातील डोंगराळ भागामध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याचे दिसत आहे. यानंतर त्या हेलिकॉप्टरचे अक्षरश: तुकडे झाले. या दुर्घटनेनंतर त्या हेलिकॉप्टरला भीषण आग लागली. त्यामुळे या परिसरातून धुराचे लोट पसरले होते. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. हिंजवडी पोलिसांच्या कंट्रोल रुमने यासंदर्भात माहिती दिली आहे. दुर्घटनाग्रस्त झालेले हेलिकॉप्टर आधी धुक्यामध्ये अडकले होते. त्यानंतर ते खाली कोसळले. त्यानंतर ते खाली कोसळले. पिंपरी चिंचवड पोलिसांना याबद्दल माहिती देण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी तातडीने हिंजवडी पोलिसात ही माहिती दिली. यानंतर हिंजवडी पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले. यात तिघांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये दोन पायलट आणि एका इंजिनिअरचा समावेश आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    विद्यापीठ व महाविद्यालयात दर्जेदार प्राध्यापकांसाठी मोठी भरती मोहीम

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.