Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अभिनेता गोविंदाच्या बंदुकीतून सुटलेली गोळी लागली पायाला
    क्राईम

    अभिनेता गोविंदाच्या बंदुकीतून सुटलेली गोळी लागली पायाला

    editor deskBy editor deskOctober 1, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    बॉलिवूड क्षेत्रातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. अभिनेता गोविंदाच्या हातातील बंदुकीतून मिसफायर झाल्याची बातमी समोर येत आहे. मुंबईत पहाटे 5 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. गोविंदा घराबाहेर जात असताना त्याच्याकडे परवाना असलेली बंदुक तपासून पाहत होता. त्याचवेळी चुकून त्यातून गोळी झाडली गेली. ही गोळी गोविंदाच्या गुडघ्याला लागली आहे. या घटनेनंतर त्याला तातडीने मुंबईतील क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या गोविंदावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती ठीक असल्याचं कळतंय.

    गोविंदाबद्दलची ही बातमी समोर येताच चाहत्यांकडून काळजी व्यक्त करण्यात येतेय. सोशल मीडियावर अनेकांनी गोविंदाच्या प्रकृतीविषयी काळजी व्यक्त केली आहे. गोविंदाचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. एकेकाळी त्याने बॉलिवूड गाजवलं होतं. 2004 मध्ये त्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. उत्तर मुंबई मतदारसंघातून त्याने राम नाइकविरोधात निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत गोविंदाला विजय मिळाला होता.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अक्षय्य तृतीयेवर बालविवाह रोखण्यासाठी राज्यभर कडक बंदोबस्त; प्रशासनाचे सतर्कतेचे आदेश”

    April 19, 2026

    भोंदू बाबा खरात प्रकरणाला राजकीय वरदहस्त? श्याम मानवांचे स्फोटक आरोप; तपासावरही उपस्थित केले प्रश्नचिन्ह !

    April 19, 2026

    २४ तासांत चोरीचा पर्दाफाश : जळगाव पोलिसांची झटपट कारवाई !

    April 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.