अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील एका १६ वर्षीय मुकबधीर मुलीवर गेल्या सात महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करून गर्भवती केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आली आहे. यात एकाला अटक केली असून इतर फरार आहे. पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
अमळनेर तालुक्यातील एका गावात राहणारी मुकबधिर १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. अल्पवयीन मुलगी ही मुकबधिर असल्याचा गैरफायदा घेत गावातील दिपक नाना भिल आणि लखन उर्फ अंकुश बुध भिल यांच्यासह इतर काही मुलांनी तिला गेल्या सात महिन्यांपासून शेतात घेवून जावून तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. या अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती झाली. हा प्रकार अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांना समजल्यावर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडीत मुलीच्या वडीलांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून रितसर तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून रविवारी ३० जानेवारी रोजी रात्री अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील संशयित आरोपी लखन उर्फ अंकुश बुध भिल याला अटक केली आहे. या घटनेची पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नरसिंग वाघ करीत आहे.