लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : चाळीसगाव येथील भोसर येथे मारहाणी प्रकरणात चाळीसगाव न्यायालयाने चौघांना दिलेली तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा जळगाव जिल्हा न्यायालयाचे न्या. एस.जी. ठुंबे यांनी रविवारी ३० जानेवारी रोजी दुपारी रद्द करून चौघांची निर्दोष मुक्तता केली आहे.
सविस्तर हकीकत अशी की, चाळीसगाव तालुक्यातील भोसर येथील लखन रावसाहेब जगताप, आनंद परमेश्वर जगताप, गणेश भगवान जगताप आणि रावसाहेब धना जगताप या चौघांनी २६ मार्च २०११ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्यांच्या घरासमोर त्यांच्या घरासमोर शौचालयासाठी खड्डा खणत असतांना त्यांना शेजारी राहणारे एकनाथ मालजी पाटील व त्यांची मुले नरेंद्र एकनाथ पाटील, संदीप एकनाथ पाटील व प्रमिलाबाई यांनी विरोधात केला. यावेळी लखन जगताप, आनंद जगताप, गणेश जगताप आणि रावसाहेब जगताप यांनी एकनाथ पाटील यांच्यासह त्यांच्या मुलांना व पत्नीला लोखंड रॉडने मारहाण करून गंभीर दुखापत केली अशी फिर्याद एकनाथ पाटील यांनी चाळीसगाव तालुका पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याच्या चौकशीकामी एकुण अकरा सरकारी साक्षीदार तपासण्यात आले. अंतिम चौकशीनंतर चाळीसगाव न्यायालयाने ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी लखन रावसाहेब जगताप, आनंद परमेश्वर जगताप, गणेश भगवान जगताप आणि रावसाहेब धना जगताप यांना प्रत्येकी तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली होती. त्या शिक्षेच्या निकालाविरोधात चारही आरोपींनी जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली. या खटल्यात अंतिम सुनावणीत रविवारी ३० जानेवारी रेाजी दुपारी २ वाजता जळगाव येथील तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस जी ठुबे यांनी चाळीसगाव न्यायालयाने चौघां आरोपींविरुद्ध दिलेला प्रत्यकी तीन वर्षे सक्तमजुरीच्या शिक्षेचा निकाल रद्द केला करून चौघांची निर्दोष मुक्ताता केली आहे. चौघांतर्फे ॲड. वसंत ढाके यांनी काम पाहिले. यासाठी ॲड. प्रसाद ढाके, ॲड. निरंजन ढाके व ॲड. भारती ढाके यांनी सहकार्य केले.


