चाळीसगाव : प्रतिनिधी
आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नांनी चाळीसगाव तालुक्यातील महावितरणच्या चाळीसगाव विभागाअंतर्गत येणाऱ्या ६ गावांना नवीन उपकेंद्रे तसेच तीन गावांच्या उपकेंद्राची क्षमता वाढविली जाणार आहे. यामुळे गावांकरिता येणाऱ्या २०३० पर्यंत ची गावांना लागणारी वीज व त्यासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर विद्युत उपकरणे संच मांयुणी साठी ए.आय.आय.बी (आर.डी ५५) (एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्वेस्टमेंट बँक) या योजनेअंतर्गत चाळीसगाव विभागीय कार्यातमयासाठी एकूण ७० कोटी इतक्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे.
या योजनेमध्ये नवीन ६ उपकेंद्राची निर्मिती होणार असून या उपकेंद्राची एकूण क्षमता (५५MVA) असणार आहे. त्यात तरवाडे गाव(१x५ MVA) बिलाखेड (१x५ MVA),टाकळी प्र.चा (१x५ MVA), डेराबर्डी (२x५ MVA), खडकी (४x१० MVA)चाळीसगाव(CTMS) (१x१० MVA) प्रमाणे क्षमता असणार आहे, सोबतच 3 उपकेंद्रांची एकूण 15(MVA) क्षमता वाढविली जाणार आहे. त्यात शिरसगाव 15 (MVA) उपकेंद्र शिरसगाव(१x५ MVA),तळेगाव (१x५ MVA),गणेशपुर (१x५ MVA) प्रमाणे क्षमता वाढविली जाणार आहे.
नवीन डीपी रोहित्र(ट्रांसफार्मर)
एकूण १५० नग (१००१ WA प्रत्येकी)
बरोबर १००x१५०=१५००० म्हणजे १५(MVA) डिपी ची क्षमता वाढ,
रोहित्र एकूण ११० नग 110 NOS
११०x१०० बरोबर ११००० म्हणजे ११ (MVA) क्षमता. नवीन उपकेंद्र व नवीन डी.पी. साठी लागणारी उच्चदाब व लघुदाब वाहिनी
३३ KV लाईन – ७४ KM
११ KV लाईन -२९६ KM
लघुदाब वाहिनी – १०८ KM
अशी राहणार आहे. यासाठी ७० कोटी इतक्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे.
ही नवीन योजना भविष्याचा विचार करून तयार करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत मंजूर असलेली सर्व उपकेंद्र व विद्युत रोहित्र ची कामे विहित वेळेत पूर्ण झाल्यास चाळीसगाव तालुक्यातील गावांची यंत्रणा ही पुढील दहा वर्षे (२०३०) पर्यंत लागणारी वीज मागणी ची पूर्तता करेल.
या योजनेमुळे विना विलंब जोडणी विद्युत ग्राहकांना मिळेल, विद्युत मंडळास ग्राहकांना अखंडीत वीज पुरवठा करण्यास मदत होईल सोबतच योग्य दाबाने विद्युत पुरवठा करणे देखील सोयीस्कर होणार आहे आणि महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना
देखभाल व दुरुस्ती करणे सुकर होईल यामुळे वीज यंत्रणेवरील ताण देखील निश्चितपणे कमी होणार आहे.
सदर योजना मंजूर करण्यासाठी आमदार मंगेश चव्हाण यांनी पाठपुरावा केला व त्यांच्या अथक प्रयत्नातून वीजयंत्रणा सक्षम करण्यासाठी व ग्राहकास योग्य दाबाने व उच्च प्रतीचा अखंडित विद्युत पुरवठा करणेकामी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या सहकार्याने योजना मंजूर करून घेतली असल्यानचे आमदार चव्हाण यांनी सांगितले असून त्यांचे आभार देखील व्यक्त केले आहे. मात्र या योजनेमुळे आमदार चव्हाण यांच्या पावरला महायुतीच्या मंत्री मंडळाचा पावरफुल पुरवठा असल्याचे स्पष्ट होते. या पावर मुळे चाळीसगाव तालुक्यात महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ पावर फुल होणार यात शंका नाही.