Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » “झेंडूचं फुल” नाटकाला जळगावकरांचा उदंड प्रतिसाद
    जळगाव

    “झेंडूचं फुल” नाटकाला जळगावकरांचा उदंड प्रतिसाद

    editor deskBy editor deskSeptember 28, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शहराचे आ. राजूमामा भोळे यांच्यातर्फे “झेंडूचं फुल” हि अस्सल लेवा गणबोली भाषेतील, हसता हसता गंभीर भाष्य करणारी नाट्यकलाकृती सलग दोन दिवस छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे दाखविण्यात आली. दोन्ही दिवस प्रचंड प्रतिसादासह जळगावकरांनी उपस्थिती दिली.

    स्नेहयात्री प्रतिष्ठान निर्मित “झेंडूचं फुल” हे नाटक वीरेंद्र पाटील यांनी लेखन व दिग्दर्शन करून तयार केले आहे. त्याला राज्यशासनासह विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे. यात ७ कलाकारांनी शेतकऱ्यांच्या जीवनाचे चित्रण दाखवून किती हाल अपेष्टा सहन करून तो स्वतःच्या परिवारासह समाज व देशासाठी योगदान देत असतो हे प्रभावीपणे सादर केले आहे. नाटकाच्या सुरुवातीला कलाकारांसह तंत्रज्ञांचा सन्मान खा. स्मिता वाघ, आ. राजूमामा भोळे यांच्यासह माजी महापौर सीमा भोळे, माजी नगरसेविका रंजना वानखेडे, गायत्री राणे, राजू मराठे, विजय वानखेडे, दीप्ती चिरमाडे यांच्या हस्ते करण्यात आला.

    यावेळी खा. स्मिता वाघ यांनी मनोगतातून कलाकारांना शुभेच्छा देऊन प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जोपासून शेतकऱ्याच्या कष्टाचे ऋण फेडले पाहिजे असे सांगितले. तर आ. भोळे म्हणाले, युवकांनी शेतीकडे वळले पाहिजे. शेती ओस पडते कि काय अशी स्थिती काही ठिकाणी दिसत आहे. आधुनिक शेती करून उत्पन्न घेता येते. शेतकरी राजा देशाचा पोशिंदा आहे. त्याला जगविणे हे समाज म्हणून आपले कर्तव्यच आहे, असेही आ. भोळे यांनी सांगितले. नाटक पाहण्यासाठी दोन्ही दिवस सभागृह हाऊसफुल्ल होता.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवारांच्या विमान अपघातावर प्रश्नचिन्ह; रोहित पवारांची भावनिक पत्रकार परिषद

    February 10, 2026

    ‘सलमान खान उद्धव ठाकरेंपेक्षा जास्त हिंदू’ : नितेश राणेंचा खोचक टोला

    February 10, 2026

    भावनिक पार्श्वभूमीत कॅबिनेट बैठक; अजित पवारांच्या प्रस्तावांवर शिक्कामोर्तब

    February 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.