Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कुसुंबा येथे बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल; एमआयडीसी पोलीसांची कारवाई
    Uncategorized

    कुसुंबा येथे बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल; एमआयडीसी पोलीसांची कारवाई

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJanuary 30, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे बेकादेशीर गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या महिलेवर एमआयडीसी पोलीसांनी रविवारी ३० जानेवारी रोजी दुपारी १ वाजता छापा टाकून १ हजार २५० रूपये किंमतीची दारू हस्तगत केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सविस्तर माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारू विक्री होत असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना रविवारी ३० जानेवारी रोज दुपारी मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अनिस शेख, पोहेकॉ गफार तडवी, पोकॉ शांताराम पाटील, महिला पोलीस आलका माळी, पोकॉ. सिध्देश्वर लटपटे यांनी दुपारी १ वाजता कुसुंबा येथे छापा टाकला. यात दारू विक्री करणारी महिला आशा विकास सोनवणे वय-३२ वर्षे, रा.सुरेशदादानगर कुसुंबा ता.जि. जळगाव या महिलेकडून १ हजला २५० रूपये किंमतीची गावठी हातभट्टीची दारू हस्तगत केली आहे. याप्रकरणी पोकॉ. सिंध्देश्वर लटपटे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस कर्मचारी करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    बचत खात्यात शिल्लक कमी? दंडाबाबत मोठी माहिती समोर

    March 11, 2026

    प्रशासकीय राजवटीतील निर्णयांवर श्वेतपत्रिका जाहीर करा नगरसेविका वैशाली अमित पाटील

    March 5, 2026

    समस्यांचा बॅकलॉग उघड! प्रभाग १३मध्ये प्रशासनाला अल्टिमेटम

    February 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.