चाळीसगाव : प्रतिनिधी
राज्यातील ग्रामसेवक संघटनांच्या बाबतीत नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत महायुती सरकारने ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी हे एकच पद करण्यास मान्यता दिली आहे. ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांची जोखीम व जबाबदारी सारखी आहे, हे पद एकच करावे यासाठी सुरू असलेल्या संघर्षाला राज्याचे महायुतीचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी समजून घेतले व ऐतिहासिक निर्णय घेतला.
याबाबत ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष श्री.संजीव निकम यांच्यासोबत सोबत टेबल टू टेबल व फाईल टू फाईल पाठपुरावा केला. त्यामुळे 22 हजार ग्रामसेवक संवर्गाला सोन्याचा दिवस आला असून राज्यातील 32 जिल्हयात याचा आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे.
आज चाळीसगाव येथे आलो असता तालुक्यातील सर्व ग्रामसेवक बंधू भगिनींच्या वतीने माझा जाहीर सत्कार करण्यात आला. राज्यातील महायुती सरकार व ग्रामविकास मंत्री ना.गिरीषभाऊ महाजन यांच्यासारखे नेतृत्व असल्याने मी याबाबत पाठपुरावा करू शकलो त्यामुळे खरे आभार त्यांचे मानले पाहिजेत अशी विनंती केली व सर्वांच्या स्वागत सत्काराचा स्विकार केला.
– आमदार मंगेश रमेश चव्हाण