जळगाव : प्रतिनिधी
येथील धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचालित शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालयात दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी विद्यार्थ्यांसाठी संगणकशास्त्र विभागातर्फे “इंटरनेट ऑफ थिंग्स व करिअर संधी” या विषयावर सेमिनार आयोजित करण्यात आले. इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT) या विषयावरील सेमिनार मध्ये दैनंदिन जीवनात जसे स्मार्टवॉच, अँड्रॉइड मोबाईल, होम अप्लायन्स, स्मार्ट सिटी बद्दल उपयुक्तता कशी आहे, याविषयी संगणकशास्त्र विभाग प्रमुख प्रा. सौ. प्रियंका बऱ्हाटे यांनी प्रस्तावनेमध्ये सांगितले. सदर सेमिनार श्री. राजेश ठाकरे, (संचालक, इलेक्ट्रोसॉफ्ट सिस्टीम, जळगाव) यांचे मार्गदर्शन लाभले.
त्यांनी Internet of Things हा प्रकार काय आहे, या क्षेत्रात नोकरी व व्यवसायात असलेल्या उपलब्ध संधी या बद्दल माहिती दिली. तसेच दैनंदिन जीवनावरील उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले. जसे की इंडस्ट्री १.० ते ४.० याविषयी सांगितले. इंडस्ट्री ४.० मध्ये ऑटोमेशन आणि इंडस्ट्री ५.० मध्ये रोबोटचा वापर करून संपूर्ण इंडस्ट्री हि आटोमेशन होत आहे याबद्दल माहिती दिली. बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे की यामुळे नोकऱ्या जातील पण तसे नसून आटोमेशन करण्याकरता आणि रोबोट तयार करण्याकरता मनुष्यबळ हे लागणारच म्हणून नोकऱ्या न जाता उलट नोकऱ्या वाढतीलच असे श्री. राजेश ठाकरे यांनी सांगितले.
प्राचार्य डॉ. विनय पाटील यांनी त्यांच्या अध्यक्षीय मनोगतामध्ये इंटरनेट ऑफ थिंग्सचा वापर आपण दररोजच्या व्यवहारीक दैनंदिन जीवनामध्ये कशाप्रकारे करतो, याबद्दल माहिती दिली. त्याचे अतिशय उपयुक्त असे उदाहरण म्हणून शेती मोटरपंप चालू आणि बंद हे मोबाईलद्वारे करू शकतो. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनय पाटील, उपप्राचार्य डॉ. पी. आर.(नाना) चौधरी, विभाग प्रमुख प्रा. प्रियांका बऱ्हाटे तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते. या सेमिनारचे सूत्र संचालन मेघा बारी व आभार उन्नती येवले या विद्यार्थीनिंनी केले.