Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” योजनेसंदर्भात अंगणवाडी सेविकांची बैठक
    जळगाव

    “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” योजनेसंदर्भात अंगणवाडी सेविकांची बैठक

    editor deskBy editor deskSeptember 27, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” या योजनेसंदर्भात आज गुरुवारी दि. २६ रोजी अंगणवाडी सेविका यांची महानगरपालिका येथे आ. राजूमामा भोळे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. लाडकी बहीण योजनेमुळे महिला सक्षम होत असून त्यामुळे परिवार सक्षम पर्यायाने समाज व देश सक्षम होत आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज न केलेल्या बहिणींनी देखील तत्काळ अंगणवाडी सेविकांकडे जाऊन अर्ज भरावा. म्हणजॆ त्यांना लाभ मिळेल, असे आ. राजूमामा भोळे यांनी सांगितले.

    महानगरपालिका येथे दुसऱ्या मजल्यावर “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” या योजनेसंदर्भात आज गुरुवारी दि. २६ रोजी बैठक उत्साहात पार पडली. यावेळी आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, उपायुक्त निर्मला गायकवाड, गणेश चाटे, सहायक आयुक्त अश्विनी गायकवाड, सुमित जाधव, महिला व बालकल्याण अधिकारी गायत्री पाटील आदी अधिकारी उपस्थित होते. सुरुवातीला योजनेच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. अंगणवाडी ताईंनी त्यांना आलेल्या विविध अनुभवांची माहिती दिली.

    तसेच, या योजनेमुळे महिलांना आर्थिक हातभार लागत असल्याने त्यांनी राज्य सरकारचे आभार मानल्याचेही अनुभव अंगणवाडी सेविकांनी सांगितले.बैठकीत आ. राजूमामा भोळे यांनी येणाऱ्या विविध अडचणींसंदर्भात जाणून घेतले. तसेच, योजनेसाठी अर्ज करणाऱ्या बहिणींच्या अर्जावर लवकर कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या आहेत. यावेळी मनपा अधिकाऱ्यांनीदेखील समस्या जाणून घेऊन जर प्रक्रियेत काही त्रुटी असतील तर लवकरच दूर केल्या जातील असे आश्वासित केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    विद्यापीठ व महाविद्यालयात दर्जेदार प्राध्यापकांसाठी मोठी भरती मोहीम

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.