पारोळा : प्रतिनिधी
एनईएस बॉईज् हायस्कूलचे मुख्याध्यापक गौतम बालुप्रसाद मिसर (वय ५५) यांनी शिपायाकडे दहा हजार रुपयांची मागणी केली होती. ही मागणी दि. १० ते १२ फेब्रुवारी दरम्यान करण्यात आली होती. त्यानंतर दि. २६ रोजी प्रकरणी पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गौतम बालूप्रसाद मिसर यांचे भाऊ यांची संस्थेचे चेअरमन म्हणून नियुक्ती झाली होती. त्यावेळी ते उपशिक्षक म्हणून कार्यरत होते. येथील शिपायांना बोलावुन नोकरी टिकवण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी केली. त्या आधारावर तक्रारदाराने धुळे लाचलुचपत विभागाकडे दि. ९ फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल केली. त्यानंतर दि.१० फेब्रुवारी आणि १२ फेब्रुवारी रोजी सापळा रचण्यात आला. लाचेची ही रक्कम इतरांकडे देण्यास सांगितले. त्यानंतर कारवाई स्थगित करण्यात आली. आता दि. २६ रोजी लाचेची मागणी केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. लाचेची मागणी केली त्यावेळी मिसर हे उपशिक्षक म्हणून कार्यरत होते. काही काळानंतर त्यांना मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. याबाबतचा अधिक तपास पारोळा पोलिस करत आहे.