Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » सीमकार्ड बंद होत असल्याचे सांगून एकाची ७४ हजाराची ऑनलाईन फसवणूक
    क्राईम

    सीमकार्ड बंद होत असल्याचे सांगून एकाची ७४ हजाराची ऑनलाईन फसवणूक

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJanuary 30, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Computer hacker sitting in front of laptop late at night and using phone
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । तुमचे सिमकार्ड बंद होणार असल्याचे सांगून गणपती नगरातील एकाची केवायसीच्या नावाखाली ७४ हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय.


    यशोधन अरूण व्यवहारे (वय-४६) रा. गणपती नगर जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. गुरूवार २७ जानेवारी रेाजी सायंकाळी ५ वाजता ते घरी असतांना त्यांना अनोळखी मोबाईल क्रमांकावरून मोबाईल समिकार्ड च्या केवायसीच्या नावाखाली कागदपत्रांची पुर्तता करण्याचे सांगून कस्टमर केअरला संपर्क साधण्याचे सांगितले. त्यानुसार यशोधन व्यवहारे यांनी लागलीत दिलेल्या नंबरवर संर्क साधला असता अनोळखी व्यक्तीने मोबाईलवर १० रूपयाचे रिचार्ज करण्याचे सांगितले. यासाठी एक ॲपर डाऊनलोड करण्याचे सांगितले. व्यवहारे यांनी ॲप डाऊनलोड केले व १० रूपयाचे रिचार्ज केला. रिचार्ज केल्याने त्यांच्या बँक खात्यातून १० रूपये कट झाले. काही वेळानंतर त्यांच्या खात्यातून पाच वेळा पैस कट झाल्याचे मॅसेजेस आले. त्याची बँक डिटेल तपासले असता व्यवहारे यांच्या बँकखात्यातून एकुण ७४ हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचे दिसून आले. व्यवहारे यांनी शनिवारी २९ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.