Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » काँक्रीट मिक्सरच्या मागच्या चाकाखाली आल्याने तरुण जागीच ठार
    क्राईम

    काँक्रीट मिक्सरच्या मागच्या चाकाखाली आल्याने तरुण जागीच ठार

    editor deskBy editor deskSeptember 26, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    भरधाव काँक्रीट मिक्सर वाहनाने दुचाकीला धडक दिल्यामुळे भुसावळ येथील के. नारखेडे कॉलेजचे लिपिक कुणाल राजेंद्र महाले (२५, रा. नहाटा नगर, भुसावळ) हे जागीच ठार झाले. तर त्यांचे सहकारी निखिल शरद ब-हाटे जखमी झाले. अपघात बुधवारी (२५ सप्टेंबर) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास महामार्गावर जळगाव ते बांभोरी दरम्यान जकात नाक्याजवळ झाला.

    मिळालेल्या माहितीनुसार, कुणाल महाले व निखिल बऱ्हाटे कॉलेजच्या कामानिमित्त भुसावळ येथून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात जात होते. जळगाव शहराच्या पुढे जकात नाक्याजवळ काँक्रीट मिक्सर वाहनाने त्यांच्या दुचाकीला कट मारला व महाले हे रस्त्यावर पडले. वाहनाच्या मागच्या चाकाखाली येऊन ते जागीच ठार झाले. दरम्यान, धडक देणारा चालक वाहनासह पसार झाला. मयत व जखमीला शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आणण्यात आले होते.
    कुणाल महाले हे तीन महिन्यांपूर्वीच भुसावळ येथील के. नारखेडे महाविद्यालयात लिपिक म्हणून नोकरीला लागले होते. घरात नोकरीचा आनंद असताना अचानक त्यांच्यावर काळाने झडप घातल्याने महाले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृताच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ असा परिवार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भरदिवसा थरार : डोळ्यात मिरची टाकत साडे पाच लाखांची रोकड लंपास !

    February 26, 2026

    बँकेतून काढले १० लाख; पंक्चरदरम्यान ८ लाखांवर चोरट्यांचा डाव !

    February 26, 2026

    ट्रॅक्टरच्या चाकाखाली दबून २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.