लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : यावल तालुक्यातील कोळन्हावी येथे बेकायदेशीर वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकावर शुक्रवार २८ जानेवारी रोजी सायंकाळी ८ वाजता यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील कोळन्हावी गावातील मुख्य चौकात यावल पोलिसाचे कर्मचारी सुशील घुगे हे शुक्रवार २८ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता गस्तीवर असताना विना नंबरचे असलेले ट्रॅक्टरमधून अवैधरित्या वाळूची वाहतूक करत असताना आढळून आले. पोलिस कर्मचारी सुशील घुगे यांनी ट्रॅक्टर थांबवून वाळू वाहतुकीची परवाना बाबत चौकशी केली असता ट्रॅक्टर चालक चेतन मच्छिंद्र सोळुंके वय-30 रा. कोळन्हावी ता. यावल यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिले. या कारणावरून पोलीस कॉन्स्टेबल यांनी ट्रॅक्टर यावल पोलिसात जमा केले असून यावल पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस कॉन्स्टेबल सुशील घुगे यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक चेतन मच्छिंद्र सोळंके याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक संदीप सूर्यवंशी करीत आहे.