लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : यावल तालुक्यातील सांगवी येथील १९ वर्षीय तरुणी घरात काहीही न सांगता बेपत्ता झाल्याची घटना शुक्रवार २८ जानेवारी रोजी सकाळी उघडकीला आले आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
यावल पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसा, पूजा धनराज बाविस्कर (वय-१९) रा. सांगवी बुद्रुक ता. यावल जि. जळगाव हे आपल्या कुटुंबीयांसह राहते. शुक्रवार २८ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता कोणाला काहीही न सांगता राहत्या घरातून निघून गेली. नातेवाईकांनी दिवसभर आणि सायंकाळपर्यंत शोधाशोध केली परंतु तरुणी कुठेही आढळून आली नाही. यासंदर्भात धनराज दगडू बाविस्कर (वय-४५) रा. सांगवी ता. यावल यांनी यावल पोलिसात धाव घेऊन माहिती दिली. याबाबत यावल पोलीसात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस नाईक किशोर परदेशी करीत आहे.