Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कुऱ्हाडीचा धाक दाखवीत रोकड लांबविली !
    क्राईम

    कुऱ्हाडीचा धाक दाखवीत रोकड लांबविली !

    editor deskBy editor deskSeptember 24, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    दोन दुकानदारांना कुऱ्हाडीचा धाक दाखवत गल्ल्यामधून २ हजार ३०० रुपये चोरून नेले. ही घटना २१ सप्टेंबर रोजी रात्री रेल्वे स्थानकाजवळ घडली. याप्रकरणी २२ रोजी शहर पोलिस ठाण्यात अजीज खान उर्फ बाबा (रा. गेंदालाल मिल) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.

    मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वेस्थानकाजवळ सैय्यद ऐहसान सैय्यद हैदर (३०, रा. शिवाजीनगर) यांचे रेल्वे स्थानकाजवळ चहा विक्रीचे दुकान आहे. २१ सप्टेंबर रोजी रात्री त्या ठिकाणी अजीज खान हा चारचाकी वाहन (एमएच १९ बीजे १२२१) घेऊन आला. त्याने कुन्हाडीचा धाक दाखवत सैय्यद ऐहसान यांना धमकावत गल्ल्यातून १ हजार ५०० रुपये काढून घेतले. त्यानंतर बाजूला असलेल्या दुकानात राहुल सुनील खर्चाने यांनाही कुऱ्हाडीचा धाक दाखवत गल्ल्यातील ८०० रुपये काढून घेतले. याप्रकरणी सैय्यद ऐहसान सैय्यद हैदर यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अजीज खानविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक अनिल भवारी करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भरदिवसा थरार : डोळ्यात मिरची टाकत साडे पाच लाखांची रोकड लंपास !

    February 26, 2026

    बँकेतून काढले १० लाख; पंक्चरदरम्यान ८ लाखांवर चोरट्यांचा डाव !

    February 26, 2026

    ट्रॅक्टरच्या चाकाखाली दबून २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.