Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पत्नी माहेरी असतांना तरुणाचा घरात आढळला मृतदेह !
    क्राईम

    पत्नी माहेरी असतांना तरुणाचा घरात आढळला मृतदेह !

    editor deskBy editor deskSeptember 23, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    पत्नी मुलांसह माहेरी व आई गुजरातला गेलेली असताना कैलास इंदल राठोड (३४, रा. सुप्रीम कॉलनी) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (२२ सप्टेंबर) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

    मिळालेल्या माहितीनुसार, मजुरी काम करणारे कैलास राठोड हे पत्नी, आई, मुलगी व दोन मुलांसह सुप्रीम कॉलनीत राहत होते. त्यांची पत्नी माहेरी व आई गुजरातला गेलेली असताना ते घरी एकटेच होते. त्यावेळी रविवारी सकाळी कैलास यांनी राहत्या घरात गळफास घेतला. दरवाजा अर्धा उघडा असल्याने शेजारच्यांना ते गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. त्यावेळी जवळच राहणाऱ्या तरुणाच्या काकांच्या घरी माहिती दिली. त्यानंतर त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे जळगाव तालुका अध्यक्षपदी सुमित पाटील व उपाध्यक्षपदी प्रविण पाटील यांची नियुक्ती

    February 5, 2026

    खळबळजनक : अज्ञात महिलेचा खून करून मृतदेह जाळल्याचा संशय !

    February 5, 2026

    दोन दुचाकीची जबर धडक : दोन तरुण जागीच ठार !

    February 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.