Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » विवाहितेला अंगावर ओढने भोवले; आरोपीला सश्रम कारावासाची शिक्षा
    क्राईम

    विवाहितेला अंगावर ओढने भोवले; आरोपीला सश्रम कारावासाची शिक्षा

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJanuary 29, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । दाम्पत्याला शिवीगाळ व मारहाण करून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीस न्यायालयाने एक महिन्याचा सश्रम कारावास आणि १ हजार रूपयांचा दंड जळगाव जिल्हा न्यायालयाने ठोठावला आहे.

    उमर शहा रोशन शहा रा. जळगाव असे आरोपीचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, शहरातील एका भागात एक दाम्पत्य राहत आहे. सन २०१७ मध्ये (नक्की तारीख माहित नाही) विवाहिता ही घरात एकटी असतांना आरोपी उमर शहा रोशन शहा रा. जळगाव हा महिलेच्या घरात घुसून वाईट हेतूने तिचा हात पकडून विनयभंग केला. विवाहितेने आरडाओरड केल्यानंतर विवाहितेचा पती पती धावत आला. विवाहितेला हात का लावला असा जाब विचारला असता आरोपी उमर शहा रोशन शहा याने महिलेच्या पतीला शिवीगाळ करून बेदम मारहाण केली होती. या घटनेत नागरीकांनी आरोपी उमर शहर रोशन शहा याला रामानंद नगर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. या गुन्ह्याचा खटला जळगाव जिल्हा न्यायालयाचे न्यायमूर्ती व्ही.व्ही. मुगळीकर यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आला. शनिवार २९ जानेवारी रोजी दुपारी या खटल्याने कामकाज झाले असता विवाहिता, विवाहितेचा पती आणि तपासाधिकारी काशिनाथ कोळंबे यांची साक्ष महत्वपुर्ण ठरली. न्या. मुगळीकर यांनी आरोपीला दोषी ठरवत एक महिन्याचा सश्रम कारावास आणि १ हजार रूपयांची दंड ठोठावला आहे. खटल्याकामी पैरवी अधिकारी राजेश भावसार, सहाय्यक अभियोक्ता रंजना पाटील यांनी कामकाज पाहिले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.