Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कष्टकऱ्यांचे देशाच्या विकासात अमूल्य योगदान : आ. राजूमामा भोळे
    जळगाव

    कष्टकऱ्यांचे देशाच्या विकासात अमूल्य योगदान : आ. राजूमामा भोळे

    editor deskBy editor deskSeptember 22, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    येथील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडलतर्फे बांधकाम कामगार महिला व पुरुषांसाठी मोफत गृहोपयोगी साहित्य संच (भांडे) वाटप कार्यक्रम नूतन मराठा विद्यालय सभागृह येथे पार पडला. कष्टकरी वर्गाला शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी कटीबद्ध असून कष्टकऱ्यांचे देशाच्या विकासात अमूल्य योगदान आहे, असे प्रतिपादन शहराचे आ. राजूमामा भोळे यांनी व्यक्त केले.

    शहरातील कामगार महिला व पुरुषांची यावेळी मोठ्या संख्येने नूतन महाविद्यालयाच्या सभागृहात उपस्थिती होती. प्रसंगी भाजपाच्या महानगर अध्यक्ष उज्वला बेंडाळे, प्रवासी कार्यकर्ता विक्रम भाई, जयेश भावसार, स्मिता वैद उपस्थित होतें. यावेळी आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते कामगार बांधवाना भांडी वाटप करण्यात आली. सदर योजनेमुळे कष्टकऱ्यांना संसारात मोठा हातभार लागला आहे. गृहोपयोगी साहित्य संच मिळाल्याने अनेक महिला व पुरुष कामगारांनी आ. राजूमामा भोळे यांचे आभार मानले.

    कष्टकरी व्यक्तींच्या आयुष्यात प्रत्येक दिवस महत्वाचा असतो. रोज काम करणार तर रोज मजुरी मिळणार अशी स्थिती असल्यामुळे त्यांना हातभार म्हणून सरकारी योजना महत्वाच्या असतात. यासाठी आज कामगारांना गृहोपयोगी साहित्य संच वाटप करण्यात आले आहे, असे यावेळी आ. राजूमामा भोळे यांनी सांगितले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    गोळीबार करणारा हिस्ट्रीशिटर भुसावळात पकडला, पोलिस कारवाईत मोठा तपास उघडला

    March 17, 2026

    शिंदेंचा दिल्लीत ‘पॉवर मूव्ह’; महायुतीत जागावाटपावर खलबतं

    March 17, 2026

    चाळीसगाव हादरले! शेडमध्ये सुटली गोळी, रिक्षाचालक गंभीर जखमी

    March 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.