जळगाव : प्रतिनिधी
घरी कोणीही नसताना रजित कमलाकर सोनवणे (४९, रा. श्रीरत्न कॉलनी, पिंप्राळा) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (२० सप्टेंबर) घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी घरात कोणीही नसताना सोनवणे यांनी राहत्या घरात गळफास घेतला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी सोनवणे यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास प्रवीण जगदाळे करीत आहेत.