जळगाव : प्रतिनिधी
बूथ प्रमुख व शिवदूत हे शिवसेनेचे खरे शिलेदार असून कार्यकर्त्यांनी विरोधी उमेदवार कोण यापेक्षा धनुष्यबाण डोळ्यासमोर ठेवा. प्रत्येक कार्यकर्त्याच्या सुख आणि दु:खात मी आणि माझा परिवार आपल्या सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो. संपर्क कधीही कमी पडू दिला नाही. आता तुमची साथ हवी आहे. सर्वसामन्य कार्यकर्त्यांची खंबीर साथ हीच माझी श्रीमंती असून शिवसेनेचे कार्यकर्ते हे थकणारे , विकणारे व झुकणारे नसून लढणारे असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे नेते व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. त्यांनी विरोधकांना चिमटे घेत टोलेही लगावले. धरणगाव तालुका शिवसेनेचा बूथ प्रमुख, शिवदूत आणि कार्यकर्त्यांच्या मेळावा पाळधी येथिल सुगोकी लॉन येथे पार पडला यावेळी ते बोलत होते.
मेरे जिस्म – और – जान में बालासाहब का नाम है ! आज अगर मै यहा हुं, तो एहसान शिवसेनेका है !! अश्या शब्दात शेरो – शायरी करत पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, शासनाच्या विकासाच्या योजना व आपण केलेल्या विकास कामांची माहिती पोहचावा. बूथ प्रमुख व कार्यकर्त्यांनी बूथ पातळीवरचे अतिशय बारकाईने नियोजन करून आपला बूथ व गाव भक्कम करा. विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालावर जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेच्या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून असते.. मी शरद पवार साहेब किंवा उद्धव साहेब ठाकरे यांच्यावर टीका करण्या इतका मोठा नाही. कार्यकर्त्यांनी मर्यादा ओळखून व जपून बोलण्याचाही सल्ला दिला.
यावेळी धरणगाव तालुक्यातील शिवसेना सदस्य नोदणीचा शुभारंभ करण्यात आला. बूथ प्रमुख, शाखा प्रमुख व शिवदूत व पदाधिकारी यांनी विजयी संकल्प करून सामुहिक शपथ घेतली. जिल्हाप्रमुख निलेश पाटील, महिला आघाडी जिल्हा प्रमुख सरिता ताई कोल्हे – माळी, पी. एम. पाटील, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर, डी. ओ. पाटील, सचिन पवार, गोपाल चौधरी, सुधाकर पाटील, पंढरी मोरे व गजानन नाना पाटील यांनी ना. गुलाबराव पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करून भगवा फडकविण्याचे आवाहन केले. यावेळी तालुक्यातील उखळवाडी व अंजनाविहिरे येथिल शेकडो कार्यकर्त्यांनी पालकमंत्री तथा शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांचे उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. सचिन पवार यांची सरपंच संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी, कैलास पाटील यांची तालुका अध्यक्षपदी तसेच अनिल माळी यांची माळी समाजाचे जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
मेळाव्याच्या प्रास्ताविकात तालुका प्रमुख डी. ओ. पाटील यांनी शिवसेना संघटना बांधणी व शिवसेना सदस्य नोदणी, बूथ प्रमुखांची जबाबदारी व कर्तव्य याबाबत सविस्तर माहिती दिली. सूत्रसंचालन युवा सेनेचे भैय्या मराठे यांनी केले. जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी आभार मानले. यावेळी सुगोकी लॉन परिसरात भगवामय वातावरण होते. मंत्री गुलाबराव पाटील यांचे आगमन होताच वाजत – गाजत , फटाक्यांच्या आतषबाजीत ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत केले.
यांची होती उपस्थिती
यावेळी जिल्हा प्रमुख निलेश पाटील, महिला आघाडी जिल्हा प्रमुख सरिताताई कोल्हे -माळी, उपजिल्हा प्रमुख पी. एम. पाटील सर, जि. प. सदस्य प्रतापराव पाटील, गोपाल चौधरी, तालुका प्रमुख डी. ओ. पाटील, माजी तालुका प्रमुख गजानन पाटील विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर, अल्पसंख्याकचे सलीम मोमीन, तौसीफ पटेल, उपतालुका प्रमुख मोती अप्पा पाटील, मोहन पाटील, युवासेनेचे तालुका प्रमुख दीपक भदाणे, आबा माळी, सरपंच संघटनेचे अध्यक्ष सचिन पवार, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, शहर प्रमुख विलास महाजन, संजय चौधरी, पप्पू भावे , वासुदेव चौधरी, विजय महाजन, बुट्ट्या पाटील, भानुदास विसावे, सुधाकर पाटील, वारकरी सेनेचे ह.भ.प. पांडुरंग महाराज, महेंद्र माळी, प्रमोद बापू पाटील, महिला आघाडीच्या पुष्पा पाटील, प्रिया इंगळे, भारती चौधरी, यांच्यासह धरणगाव तालुक्यातील बुथ प्रमुख, शिवदूत, सरपंच, उपसरपंच सदस्य पदाधिकारी व लोकप्रतिनिधी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.