Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » उसनवारीचे पैसे मागितल्याचा राग तरुणाला बेदम मारहाण
    क्राईम

    उसनवारीचे पैसे मागितल्याचा राग तरुणाला बेदम मारहाण

    editor deskBy editor deskSeptember 21, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    उसनवार दिलेले दोन लाख रुपये लवकर परत कर, असे बोलल्याच्या कारणावरून दिनेश मांगीलाल ओझा (२५, रा. प्रजापत नगर) यांना तीन जणांनी शिवीगाळ करत मारहाण केली. ही घटना १८ सप्टेंबर रोजी रात्री प्रजापत नगरात घडली. याप्रकरणी गुरुवारी (१९ सप्टेंबर) तालुका पोलिस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, केटरिंग व्यावसायिक दिनेश ओझा यांनी उस्मानिया पार्कमधील एकाला उसनवारीने दोन लाख रुपये दिले आहे. बुधवारी ओझा यांनी लाख रुपये मला लवकर परत कर, असे सांगितले. त्यावरून तीन जणांनी शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण केली. याप्रकरणी दिनेश ओझा यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मारहाण करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ दिनेश चव्हाण करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘माझे दुःख कोणाला सांगू, मी एकटा पडलो’ : वाढदिवसाला न बोलविल्याने संपविले आयुष्य !

    April 9, 2026

    धक्कादायक! शाळेबाहेरील गैरकृत्यांमुळे ‘त्या’ शिक्षकावर गाजले निलंबन !

    April 9, 2026

    पाहुणी बनून घरात शिरली, विश्वासघात करून दागिने लंपास; ९७ हजारांची चोरी !

    April 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.