जळगाव प्रतिनिधी । उस्मानियॉ पार्क येथील तरूणाचा ममुराबाद रोडवर गळा आवळून खून करण्यात आला होता. हा खून अनैतिक संबंधातून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे.
शेख शाबीर शेख सूपडू (वय-३३) आणि शेख फारूख उर्फ छोटू शेख शौकत (वय-२१) दोन्ही रा. श्रीरामपेठ जामनेर ,जळगाव असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी की, ममुराबाद रोडवर उस्मानियॉ पार्क येथील रहिवाशी शेख गफ्फार शेख जब्बार (वय-३५) या तरूणाचा मृतदेह आढळून आल्याचे गुरूवारी खळबळ उडाली होती. याप्रकरणी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांसह मित्रपरिवाराची प्रचंड गर्दी जमली होती. मयत शेख गफ्फार याचा अज्ञात व्यक्तीने खून केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. या गुन्ह्यातील आरोपींना अटक करावी अशी मागणी केली होती. दरम्यान सायंकाळी मृतदेहाचे शवच्छेदन केल्यानंतर गळा आवळून खून केल्याचे वैद्यकीय अहवालात निष्पन्न झाले होते. त्यानुसार गुरूवारी २७ जानेवारी रोजी सायंकाळी जळगाव तालुका पोलीसात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा मारेकऱ्यांचा तपासासाठी पोलीस कर्मचारी रवाना झाले होते. यात शेख शाबीर शेख सुपडू (वय-३३) रा. श्रीरापेठ जामनेर याला चौकशी साठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता मयत शेख गफ्फार याची पत्नी आणि संशयित आरोपी शेख शाबीर याचे अनैतिक संबंध असल्याचे कबुल केले. दोघांच्या संबंधाबाबत मयत शेख गफ्फार याला समजले होते. यासाठी त्याचा काटा काढण्यासाठी संशयित आरोपी शेख शाबीर शेख सपडू याने सहकारी शेख फारूख उर्फ छोटू शेख शौकत (वय-२१) रा. श्रीरामपेठ जामनेर यांनी यांनी कारमध्ये घेवून ममुराबाद रोडवर सुतीच्या दोरीने गळफास देवून ठार केले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी जळगाव तालुका पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलीस अधिक्षक प्रविण मुंढे, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल देवढे, सहाय्यक फौजदार अशोक महाजन, विजयसिंग पाटील, संजय हिवरकर, राजेश मेंढे, सुनिल दामोदरे, जितेंद्र पाटील, अश्रु शेख निजामोद्दिन, अक्रम शेख, लक्ष्मण पाटील, संदीप सावळे, नितीन बाविस्कर, रणजित जाधव, किशोर राठोड, राहूल पाटील, अविनाश देवरे, श्रीकृष्ण देशमुख, विजय पाटील, संतोष मायकल, विनोद पाटील, ईश्वर पाटील, राजेंद पवार, भारत पाटील, अशोक पाटील, दर्शन ढकणे यांनी कारवाई केली.