जळगाव : प्रतिनिधी
शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेनेची मुलुख मैदान तोफ म्हणून ओळख असलेले गुलाबराव पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिंदे गटात प्रवेश केला. मात्र गुलाबराव पाटलांनी एकनाथ शिंदे सोबत जाण्याचा निर्णय एकनाथ शिंदे सह उद्धव ठाकरेंकडून कायम गुलाबराव पाटलांना निशाणा करण्यात आला एवढेच नाही तर गद्दारी केल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे यांच्या सह आदित्य ठाकरे संजय राऊत सुषमा अंधारे यांनी गुलाबराव पाटलांच्या मतदारसंघात सभा घेवून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सत्तांतरानंतर गुलाबराव पाटलांच्या विरोधात त्यांच्याच मतदारसंघात मोठ्या संख्येने कार्यकर्ते हे दुरावले होते. तर संजय राऊत यांनी थेट गद्दारांना गडायचा आव्हान दिल्याने गुलाबराव पाटलांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट निवडणूक लढणार असल्याचे चित्र स्पष्ट केले होते. त्यामुळे उमेदवारी मिळण्याच्या अशेने जळगाव ग्रामीण मतदार संघातील अनेक इच्छुकांच्या आशा पल्लवी झाल्या होत्या. पण एकाच वर्षात सहानुभूतीच्या जोरावर गुलाबराव पाटलांपासून दुरावलेले अनेक कार्यकर्ते पुन्हा गुलाबराव पाटलांकडे परतले असून त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाची सहानुभूतीची लाट ओसरली गेली आहे.
उद्धव ठाकरे ,आदित्य ठाकरे एवढेच नाही संजय राऊत यांनी देखील जळगाव ग्रामीण मतदार संघाचा दौरा करून गुलाबराव पाटलांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची ललकारी दिली होती त्यामुळे जळगाव ग्रामीण मतदार संघाची जागा ही शिवसेना ठाकरे गटाकडे राहणार असल्याने इच्छुक उमेदवारांच्या ही आशा पल्लवी झाल्या होत्या. मात्र लोकसभा निवडणूक किती शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराला जळगाव ग्रामीण मतदार संघात मिळालेले मतदान व नुकताच संजय राऊत यांनी जळगाव ग्रामीण मतदार संघाचा केलेला दौरा यानंतर कुठेतरी शिवसेना ठाकरे गटाची गुलाबराव पाटलांच्या विरोधातील ललकारी ही हवेत उडाली की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. त्याचे कारण इच्छुक उमेदवारांबाबत पक्षाकडून उदासीनता वाढली असून उमेदवारी बाबत पक्षाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने इच्छुकांची घालमेल वाढली आहे. तर लोकसभा निवडणुकीच्या पराभवाचे कारण पुढे करत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जळगाव ग्रामीण मतदार संघावर दावा केला जात असून त्यामुळे सुरुवातीच्या काळात उमेदवारी आपल्या पदरात पडेल या आशेने उद्धव ठाकरे यांना साथ देणाऱ्या इच्छुक उमेदवारांची चिंता वाढली आहे. जळगाव ग्रामीण मतदार संघ हा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे गेल्यास नाराज इच्छुकांमुळे पक्षांतराचा देखील मोठा फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसू शकतो.
जळगाव जिल्ह्यात सहानुभूतीच्या जोरावर लोकसभा निवडणुकीत महायुतीच्याच पक्षातील नेत्याला फोडून शिवसेना ठाकरे गटाने लोकसभेची उमेदवारी दिली होती. मात्र ठाकरेंचा हा प्रयोग सपशेल अपयशी ठरल्याने विधानसभा निवडणुकीत मोठ रिक्स फॅक्टर ठाकरे गटाला ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुठलाही धोका न पत्करण्याची भूमिका ही ठाकरे गटाच्या नेत्यांनी घेतल्याने इच्छुकांच्या आशेवर काहीसे विरजण पडले असून महाविकास आघाडीत पक्ष वाटपात जळगाव ग्रामीण मतदार संघ हा कुठल्या पक्षाला मिळणार याकडे आता इच्छुक डोळ्यात तेल घालून लक्ष लावून बसले आहेत.