पुणे : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून राज्यातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असतांना पुणे जिल्ह्यातील राजगड पोलीस ठाणे हद्दीत पुणे – सातारा महामार्गावरील एका गावात ही धक्कादायक घटना घडली. ही घटना मंगळवारी दि.17 सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती समजताच राजगड पोलीस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. यावेळी आरोपीने पलायन केले होते. पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवून संबंधित नराधम आरोपीला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही कुटुंब बाहेर गावचे असून महामार्गलगत असणाऱ्या एका गावात भाडोत्री म्हणून राहत आहेत. पीडित बालिका आणि नराधम मुलाने हे शेजारी राहत आहेत. दोन वर्षीय मुलगी संबंधित मुलाकडे खेळायला जात असे. लहान मुलीची आई सकाळी कपडे धुत असताना मुलाने मुलीला त्याच्या खोलीत घेऊन आतून कडी लावून घेतली. त्यानंतर मुलीचा रडण्याचा आवाज आल्याने मुलीच्या आईने बंद असलेल्या खोलीकडे धाव घेऊन दरवाजा प्रयत्न केला. पण, मुलाने दरवाजा उघडला नाही. आरडाओरडा केल्यानंतर आरोपी मुलगा मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देऊन पळून गेला होता. पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे हलवली अन् आरोपी मुलाल अटक केली. मुलाने त्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केले असल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.