बोदवड : प्रतिनिधी
भुसावळ-बोदवड बस व दूधवाहिनीची समोरासमोर धडक झाली. बस चालकाने रस्त्याच्या बाजूला खड्यात बस उतरविल्याने मोठा अपघात टळला. यात एक महिलेसह दोन जण किरकोळ जखमी झाले. ही घटना बुधवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ आगारची बस क्रमांक (एम एच २० बि एल २५०५) ही भुसावळहून बोदवडकडे येत असताना साळशिंगी गावाजवळ भुसावळ कडे जाणारी दुधवाहिनी क्रमांक (एम एच ०४ एच डी ५५८८) यांच्यात समोरा समोर धडक झाली. बसचा पत्रा निघाला. बस चालकाने समयसूचकता साधत बस रस्त्याच्या बाजूला खड्ड्रयात उतरविली.
या अपघातात नर्मदाबाई भाऊजी पाटील (रा. गोळेगाव) यांच्या नाकाला गंभीर दुखावत झाली आहे. आनंद सखाराम पाटील (रा. शहापूरा ता. पाचोरा) किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघातात दुधवाहिनीचेही नुकसान झाले आहे, घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत मदत कार्य केले. प्रवासी ना उतरवून घेत पंचनामा केला. जखमी प्रवासी महिलेला रुग्णालयात हलविले आहे. तर बसचालक किशोर धोंडू कुठारे रा. कुन्हा पानांचे ता. भुसावळ यांच्या फिर्यादीवरून अपघाताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.