Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » एकुलत्या एक भावासह वडिलांचा तलावात बुडून मृत्यू !
    क्राईम

    एकुलत्या एक भावासह वडिलांचा तलावात बुडून मृत्यू !

    editor deskBy editor deskSeptember 18, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लातूर  : वृत्तसंस्था

    राज्यात सर्वत्र गणेश विसर्जनाची धामधूम सुरु असतांना नुकतेच लातूर येथील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शेताजवळील पाझर तलावात बैल धुण्यासाठी गेलेल्या शेतकरी पिता पुत्रांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. १७) शिवाजीनगर तांडा (ता. जळकोट) येथे घडली. तिरुपती बाबुराव पवार (वय ४२) आणि नामदेव तिरुपती पवार (वय १२) रा. माळहिप्परगा असे मृत पिता-पुत्राचे नाव आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशीच घटना घडल्याने माळहिप्परगा व पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त होत आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, जळकोट येथील शिवाजीनगर तांडा (माळहिप्परगा) येथील २२० केव्ही उपकेंद्राजवळ तिरुपती पवार यांची शेती आहे. मंगळवारी तिरूपती मुलगा नामदेव याला घेऊन शिवाजीनगर तांडा येथील पाझर तलाव क्र १ वर बैल धुवायला गेले होते. यावेळी पाण्यात बुडून दोघांचाही मृत्यू झाला. तिरुपती पवार यांना नामदेव हा एकुलता एक मुलगा होता. दोघांच्याही मृत्यूने पवार कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिरुपती पवार यांच्या पश्चात पत्नी, दिव्यांग वडील, ४ मुली असा परिवार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वेगवेगळ्या राज्यांचे पत्ते, पेमेंट रोखून फसवणूक; ‘रेझॉरपे’ व्यवहारातून प्रकार उघड

    April 12, 2026

    डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त जळगाव शहरात वाहतूक बदल !

    April 12, 2026

    भुसावळ विभागात ‘फोर्ट्रेस’ मोहीम; ६०१ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई, ४.३० लाखांचा दंड वसूल

    April 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.