पुणे वृत्तसंस्था । शिक्षकांसाठी टीईटी परिक्षेत मोठा घोटाळा समोर आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. यात तब्बल तब्बल ७८०० परीक्षार्थींना पैसे देऊन पात्र केल्या धक्कादायक माहिती पुणे सायबर पोलीसांनी समोर आणली आहे.
पुणे पोलिसांच्या सायबर पोलिसांकडून याप्रकरणी सध्या तपास सुरु आहे. या तपासातून 7 हजार 800 जणांना पैसे देऊन पात्र केले आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत हा आकडा आणखी मोठा होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांच्या तपासातून आणखी मोठे आकडे समोर येण्याचीही दाट शक्यता आहे. पुणे सायबर पोलिसांना आरोग्य विभागाच्या परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा तपास करताना टीईटी परीक्षेतही गैर प्रकार झाल्याप्रकरमी महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले होते. मात्र सायबर पोलिसांतून अनेकांना कोरोनाची लागण झाल्यामुळे काही काळ याप्रकरणाचा तपास थंडावला होता. मात्र आता पुन्हा एकदा याप्रकरणी तपासाला वेग आला आहे.
टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे, माजी आयुक्त सुखदेव डेरे, शिक्षण विभागाचा तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर, जीए टेक्नॉलॉजीचा आश्विन कुमार, सौरभ त्रिपाठी डॉ. प्रीतिश देशमुख याच्यासह इतरांना अटक करण्यात आली होती.
पुणे पोलीस टीईटी गैरव्यवहार प्रकरणात पैसै घेणाऱ्या दलालांच्या शोध घेत आहे. पोलिसांच्या रडारवर टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणातील एजंटांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. यात पाच कोटी दिल्याची कबुली दिल्याचा दावा पुणे पोलिसांनी न्यायालयात केला आहे. त्यामुळे आता सायबर पोलिसांकडून आता एजटांची तपासणी करण्यात येणार आहे. 2018 साली टीईटीची परीक्षा घेणाऱ्या जी ए सॉफ्टवेअरच्या अश्विनकुमार याला अभिषेक सावरीनं 5 कोटी रुपये दिल्याचं पोलिस तपासात उघड झालं होतं. ज्या परीक्षार्थीकडून पैसे घेतले त्यांचाही शोध केला जात आहे.