Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अनैतिक संबंधासाठी आईने पोटच्या मुलाचा केला खून; जळगाव तालुका पोलीसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
    क्राईम

    अनैतिक संबंधासाठी आईने पोटच्या मुलाचा केला खून; जळगाव तालुका पोलीसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJanuary 27, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : मैत्रीत अडसर ठरणाऱ्या पोटच्या मुलाला आईने मित्राच्या मदतीने मध्यप्रदेशातील जंगलात गळफास देवून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आले आहे. या गुन्ह्यात आईसह सहकाऱ्याला बुधवारी २७ जानेवारी रोजी दुपारी जळगाव तालुका पोलीसांनी अटक केली असून पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

    पुरूषोत्तम उर्फ प्रशांत विलास पाटील (वय-१४) रा. सावखेडा शिवार, जलाराम नगर जळगाव असे मयत मुलाचे नाव आहे. तर मंगलाबाई विलास पाटील (वय-३५) रा. जलाराम नगर आणि प्रमोद जयदेव शिंपी (वय-३८) रा. विखरण ता. एरंडोल असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहे. महिला ही मयत प्रशांतची आई आहे.

    याबाबत माहिती अशी की, विलास नामदेव पाटील हे चालक असून पत्नी मंगला पाटील आणि मुलगा प्रशांत पाटील यांच्यासह जलाराम नगरात वास्तव्याला आहे. विलास पाटील हे खासगी वाहन चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मंगला पाटील आणि  प्रमोद शिंपी यांची गेल्या एक वर्षांपासून ओळख होती. मैत्रीत मुलगा प्रशांत पाटील अडसर ठरत असल्याने आई मंगलाबाई आणि प्रमोद शिंपी यांनी मुलाला रविवारी १६ जानेवारी रोजी दुपारी कबुतर ठेवण्याचा पिंजारा रावेर येथून घेवून येवू असा बहाणा आई मंगलबाई आणि प्रमोद याने केला. दोघांनी प्रशांतला सोबत घेवून मध्यप्रदेशातील बऱ्हाणपुर गावानजीकच्या जंगालात प्रशांत पाटील याला गळफास देवून झाडाला लटकावून दिला. तेथून महिला ही पुन्हा जळगावात घरी आली. इकडे मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार प्रशांतचे वडील विलास पाटील यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी हरविल्याची नोंद करण्यात आली. पोलीसांनी मयत प्रशांतच्या मोबाईलचे कॉल डिटेल तपासले असता प्रमोद शिंपी यांच्या मोबाईलवर वारंवार कॉल केल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलीसांनी तांत्रिक मदतीने प्रमोद शिंपी आणि मयत प्रशांत पाटीलचे लोकेशन एक असल्याचे दिसून आले. त्यानुसार पोलीसांनी तपासाला सुरूवात केली.

    पोलीसांनी बुधवारी २६ जनेवारी रोजी दुपारी २ वाजता संशयित आरोपी प्रमोद जयदेवर शिंपी याची कसून चौकशी केली असता गुन्ह्याची कबुली दिली. यासाठी मयत प्रशांतची आई मंगलाबाई पाटील हिचापण सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. तालुका पोलीसांनी दोघांना अटक केली. 

    मुलाचा खून करणाऱ्या दोन्ही संशयितांना गुरूवार २७ जानेवारी रोजी दुपारी जळगाव जिल्हा न्यायालयात हजर केले असता दोघांना न्यायालयाने १ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. या गुन्ह्याच्या तपासाकामी पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, उपनिरीक्षक नयन पाटील, सहाय्यक फौजदार वासुदेव मराठे, सतीश हाळणोर व भांडारकर यांनी काम पाहिले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.