Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मोठी बातमी : मंत्री महाजनांना धक्का : भाजप नेत्याने दिला राजीनामा
    जळगाव

    मोठी बातमी : मंत्री महाजनांना धक्का : भाजप नेत्याने दिला राजीनामा

    editor deskBy editor deskSeptember 16, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतीनिधी

    राज्यात आगामी विधानसभा निवडणुक लक्षात घेता. सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. तर आता राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदार संघातील एका मोठ्या नेत्याने पक्षाचा राजीनामा दिला. यावेळी त्यांनी मंत्री महाजन आणि भाजपमध्ये प्रामाणिक कार्यकर्च्यांचा होणारा कोंडमारा, गैरप्रकारांचा उल्लेख केला.

    भाजप नेते आणि जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे यांनी पक्षाचा राजीनामा दिला. आज त्यांनी याबाबत दिलेल्या राजीनामा पत्रात पक्षाच्या कार्यपद्धतीवर आणि जिल्ह्यातील नेत्यांवर अप्रत्यक्षरीत्या गंभीर आरोप केले आहेत. हा राजीनामा भाजपला मोठा धक्का मानला जातो.

    भाजपमध्ये सध्या केवळ पैसे कमविण्याची स्पर्धा सुरू आहे. दुसऱ्याला बदनाम करून मोठे होण्याची ओढ सुरू आहे. प्रत्येक गावात पक्षामध्ये दोन गट तयार केले जात आहेत. गेली ३५ वर्षे भाजपच्या विस्तारासाठी काम केले. सध्याच्या पक्षांतर्गत स्थितीमुळे अस्वस्थ होऊन राजीनामा देत आहे, असे त्यांनी म्हटले. निष्ठावंत कार्यकर्ते व नेते अस्वस्थ आहेत त्यांची अवहेलना केली जात आहे. असे अनेक आरोप या राजीनामा पत्रात आहेत. जळगाव भाजपचे नेतृत्व मंत्री गिरीश महाजन करतात. त्यामुळे यानिमित्ताने महाजन यांची कार्यपद्धती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

    भाजपचे नेते श्री खोडपे हे मंत्री महाजन यांच्या विधानसभा मतदारसंघ जामनेर येथील आहेत. ते मंत्री महाजन यांचे निकटवर्तीय होते. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्याचा आगामी विधानसभा निवडणुकीत परिणाम दिसेल.
    श्री खोडपे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत येत्या २१ सप्टेंबरला जामनेर येथे प्रवेश करणार आहेत. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी त्याला संमती दिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मंत्री महाजन यांची जामनेर विधानसभा मतदारसंघातील वाट सोपी राहिलेली नाही, हे या राजीनामाच्या निमित्ताने स्पष्ट झाले. मंत्री महाजन यांना श्री. खोडपे आव्हान देणार आहे. त्यांना बहुजन समाजातील विविध घटकांचा पाठींबा आहे.

    आगामी विधानसभा निवडणुकीत जामनेर मतदार संघातून श्री खोडपे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. श्री महाजन यांचे कट्टर विरोधक एकनाथ खडसे यांचे देखील या राजकीय घडामोडींमध्ये पडद्यामागे मोठी भूमिका असल्याचे बोलले जाते. या निमित्ताने जामनेर मतदार संघात मंत्री महाजन यांना मोठा धक्का बसू शकतो. त्यामुळे श्री खोडपे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेश रोखण्यासाठी श्री महाजन गेले दोन दिवस प्रयत्नशील होते.

    रविवारी मंत्री महाजन यांनी जामनेर मतदार संघात विविध बैठका घेऊन श्री खोडपे यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर मोठा राजकीय दबाव होता. मंत्री महाजन यांनी विविध पदाधिकारी, नेत्यांमार्फत खोडपे यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. भाजपच्या विविध नेत्यांचा दबाव झुगारून श्री खोडपे यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. हा राजीनामा मंत्री महाजन यांना मोठा राजकीय धक्का मानला जातो. या राजीनाम्याने मी विधानसभा निवडणुकीत जामनेर मतदार संघात मोठी चुरस निर्माण होईल.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    छत्रपती चौकात भाजपची जंगी सभा; नगराध्यक्षपदासाठी प्रतिभा चव्हाण मैदानात

    November 17, 2025

    राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफीवर मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका !

    November 17, 2025

    संकट मोचकाच्या तथाकथित हनुमानाची भुसावळच्या विजुभाऊची सुपारी यावलमध्ये फेल

    November 17, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.