Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कासोद्यात घराचे खोदकामात चांदीचे शिक्के व सोन्याचे दागीने सापडले
    जळगाव

    कासोद्यात घराचे खोदकामात चांदीचे शिक्के व सोन्याचे दागीने सापडले

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJanuary 27, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे घराचे खोदकाम करतांना पुरातन सोन्याचे व चांदीचे शिक्के व दागिने असा एकुण १९ लाख १७ हजार २८३ रूपये किंमतीचा मुद्देमाल सापडला आहे. हा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे.

    स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून मिळालेली माहिती अशी की, एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील रहिवाशी ताराबाई गणपती समदानी यांच्या जुन्या व पडक्या घराचे खोदकाम करण्याचे काम गावातील जेसीबी चालक जितेंद्र बिरबल यादव (वय-३२) , ट्रॅक्टर चालक ज्ञानेश्वर संतोष मराठे (वय-५०), संजय उर्फ सतिष साहेबराव पाटील (वय-३५) सर्व रा. कासोदा ता.एरंडोल आणि राहूल राजू भिल (वय-२४) रा. बोरगाव ता. धरणगाव ह.मु. कासोदा यांना देण्यात आले होते. घराचे खोदकाम सुरू असतांना या चार जणांना खोदकाम करतांना चांदीचे शिक्के आणि सोन्याचे दागिने मिळून आले. हे चांदीचे शिक्के सन १९०५ ते १९१९ कालावधीतील असून सोन्याचे दागिनेसुध्दा पुरातन काळातील असल्याने ते स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केले. त्यांची अंदाजित रक्कत १९ लाख १७ हजार २८३ रूपये किंमतीचे असल्याचे ज्वेलरी दुकानदाराकडून तपासणी करून खात्री केली आहे. सर्व दागिने व चांदीचे शिक्के कासोदा पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    वडिलांना मारहाण केल्याचा राग; वाल्मिक नगरात तिघांवर दोन राऊंड फायर, संशयित अटकेत !

    March 15, 2026

    वरसाडे तांड्यातील बेपत्ता तरुणाच्या खुनाचा उलगडा; प्रेमसंबंधातून पती-पत्नीने रचला कट

    March 15, 2026

    धावत्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे अँगल तुटले : वढोदा जवळ अपघातात एक ठार, तिघे जखमी

    March 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.