धरणगाव : प्रतिनिधी
मंदिरात दर्शन घेण्याच्या बहाण्याने दिव्यांग पतीला शेतात नेऊन विहिरीत ढकलून देत खून केल्याची घटना घडली होती. यातील संशयित ज्योती प्रकाश सुर्यवंशी यांनी उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. त्यावर कामकाज झाल्यानंतर न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेतील मंदिरात दर्शनासाठी घेवून गेलेल्या प्रकाश यादव सुर्यवंशी (वय ३६, रा. भवरखेडा, ता. धरणगाव) या दिव्यांग पतीला त्यांची पत्नी ज्योती प्रकाश सुर्यवंशी यांनी दि. २ रोजी विहरीत ढकलून देत खून केला होता. याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित ज्योती सुर्यवंशी यांना अटक करण्यात आली होती. जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावल्याने संशयिताच्या वतीने अॅड. भूषण महाजन यांनी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. याठिकाणी न्यायाधीश एस. जी. मेहरे यांच्या न्यायालयासमोर दि. १३ रोजी सुनावणी पार पडली. न्यायालयाने संशयीत ज्योती सुर्यवंशी यांचा जामीन अर्ज मंजूर केला. संशयिताच्या वतीने अॅड. भुषण महाजन यांनी कामकाज पाहिले.