जळगाव : प्रतिनिधी
नियमित तपासणीसाठी रुग्णालयात जात असतांना शासकीय आशादीप महिला वस्तीगृहाच्या अधीक्षिका मयूरी देवेंद्र राऊत-कपरे (वय ३२, रा. श्रीरामनगर, दादावाडी) यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांच्या पतीला मानसिक धक्का बसल्याने जिल्हा परिषदेतील महिला व बालविकास विभागातील जिल्हा कार्यक्रम अधिकारी देवेंद्र राऊत यांनी सहा मजली इमारतीवर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतू त्याठीकाणी काम करणाऱ्या मजूरांच्या लक्षात हा प्रकार आल्याने त्यांनी राऊत यांना वाचवले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात सुरु आहे. ही दुर्देवी घटना शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेतील महिला व बालविकास विभागातील जिल्हा कार्यक्रम अधिकारी देवेंद्र राऊत व त्यांची पत्नी आशादीपक महिला वस्तीगृहाच्या अधीक्षिका मयूर राऊत हे दोन मुलीसह दादावाडीतील श्रीराम नगरात वास्तव्यास आहे. गेल्या काही दिवसांपासून राऊत यांची प्रकृती खराब असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यानुसार शनिवार दि.१४ सप्टेंबर रोजी शासकीय सुट्टी असल्याने मयूर राऊत या पती देवेंद्र यांना दुचाकीवरुन रुग्णालयात गेल्या होत्या. स्वतः दुचाकी चालवून त्या रुग्णालयात पोहचल्या. मयूरी राऊत या मोबाईलवर बोलत असताना अचानक खाली कोसळल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. पत्नी अचानक सोडून गेल्याने राऊत यांना मोठा धक्का बसला व ‘मी राहून काय करू, स्वतःलाही संपून टाकतो’, असे म्हणत ते समोरील एका इमारतीवर चढले व स्वतःला झोकून देण्याचा प्रयत्न केला. इमारतीमध्ये काम करणाऱ्या मजूरांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या देवेंद्र राऊत यांना रोखले. यावेळी त्यांना सावरत असतांना खरचटल्यामुळे त्यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली. त्यानंतर इमारतीवरुन खाली उतरवून त्यांना खासगी रुग्णयालयात दाखल केले. देवेंद्र राऊत यांना मोठा मानसिक धक्का बसला असून यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर मयुरी राऊत यांना शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत मृत घोषित केले.
राऊत दाम्पत्याला गौवी व गाथा या दोन मुली असून त्या दोन्ही शाळेत गेलेल्या होत्या. त्यांच्या आईवर दुर्देवी काळाने झडप घातल्यामुळे त्यांच्या डोक्यावरील मातृछत्र हरपले आहे. शवविच्छेदनानंतर मयुरी यांचा मृतदेह घुलेवाडी, संगमनेर या त्यांच्या मूळगावी नेण्यात येणार आहे. यासाठी त्यांचे भाऊ व अन्य नातेवाईक जळगावला येण्यासाठी निघाले होते. दुसरीकडे पतीला ७२ तास वैद्यकीय निगराणीखाली राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे पती विना त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतात की काय, असा दुर्दैवी प्रसंग ओढावला आहे.