Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात तरुणीसोबत फिरत असल्याच्य संशयावरून तरुणाला मारहाण !
    क्राईम

    जळगावात तरुणीसोबत फिरत असल्याच्य संशयावरून तरुणाला मारहाण !

    editor deskBy editor deskSeptember 15, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    व्हीआयपी केटरर्सची ऑर्डर घेण्यासाठी नाशिक येथून आलेल्या एक तरुणीला दुचाकीवरुन घेवून जात असताना गैरसमज होऊन मोहीत राजेश चव्हाण (२७, रा. सम्राट कॉलनी) या तरुणाला १० ते १५ जणांच्या टोळक्याने मारहाण केली. त्याच्यावर चॉपरसारख्या धारदार शस्त्राने वार करीत गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास शेरा चौकात घडली. तरुणावर जीएमसीत उपचार सुरू असून एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

    मिळालेल्या माहितीनुसार, सम्राट कॉलनीत मोहित चव्हाण याचा इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय आहे. शहरातील एका हॉटेलमध्ये कार्यक्रम असल्याने त्याठिकाणी व्हीआयपी केटरर्सची आवश्यकता होती. त्यामुळे मोहीतने नाशिक येथील एका एजन्शीशी संपर्क साधून केटरर्स पुरविण्यास सांगितले होते. त्याचे बुकींग करण्यासाठी शनिवारी दुपारी एजन्सीची एक तरुणी जळगावात आली. तिला घेऊन मोहीत हे औद्योगिक वसाहत परिसरातील एका हॉटेलमध्ये जात होते.

    या दोघांचा पाठलाग करीत दोन दुचाकीस्वारांनी काशिनाथ चौफुलीजवळील थांबविले व सदर तरुणीचे नातेवाईक जळगावात आले असून त्यांच्यासोबत बोलण्यासाठी चला असे सांगून त्यांना शेरा चौकात घेवून गेले. तेथे चार ते पाच जणांनी मोहीतला ‘तरुणीसोबत तुझा काय संबंध, तिला सोबत घेवून कुठे फिरतो’ असा जाब विचारला व आणखी काही जणांना बोलवून घेतले. त्यांनी मोहीतला लोखंडी रॉडने मारहाण करण्यासह व चॉपर सारख्या शस्त्राने वार केले. यात तो रक्तबंबाळ होऊन गंभीर जखमी झाला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवार ठाण्यात ठिय्या

    February 26, 2026

    तरुण मामीचा सख्ख्या भाच्याने केला विनयभंग ; गुन्हा दाखल !

    February 26, 2026

    भरदिवसा थरार : डोळ्यात मिरची टाकत साडे पाच लाखांची रोकड लंपास !

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.