Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धावत्या रेल्वेतून पडल्याने एकाचा दुर्देवी मृत्यू
    क्राईम

    धावत्या रेल्वेतून पडल्याने एकाचा दुर्देवी मृत्यू

    editor deskBy editor deskSeptember 14, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    धावत्या रेल्वेतून पडल्याने कमल रेवाराम पटेल (५३, रा. लोणारा, जि. खरगोन, मध्य प्रदेश) या परप्रांतीय इसमाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (१२ सप्टेंबर) रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास जळगाव ते भादली रेल्वेस्थानकादरम्यान घडली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (१२ सप्टेंबर) रात्री सव्वानऊ वाजेच्या दरम्यान जळगाव ते भादली रेल्वेस्थानकादरम्यान रेल्वे खांबा क्रमांक ४२४/१४ ते ४२४/१६ दरम्यान धावत्या रेल्वेतून पडून एकाचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलिस ठाण्याचे पोहेकॉ सुधाकर शिंदे व जयेंद्रसिंग पाटील हे घटनास्थळी पोहोचले व मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रवाना करण्यात आला. या प्रकरणी सुरुवातीला तालुका पोलिस ठाण्यात अनोळखीचा मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. मात्र, मयताच्या खिशात आधार कार्ड सापडल्याने त्यावरून त्याची ओळख पटली व कमल पटेल असे त्याचे नाव असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवार ठाण्यात ठिय्या

    February 26, 2026

    तरुण मामीचा सख्ख्या भाच्याने केला विनयभंग ; गुन्हा दाखल !

    February 26, 2026

    भरदिवसा थरार : डोळ्यात मिरची टाकत साडे पाच लाखांची रोकड लंपास !

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.