यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील किनगाव येथील बस स्थानकावर एसटी बसमध्ये बसत असताना मागील चाकाखाली आल्याने कमलबाई रामराव अंडाईत ही ८१ वर्षीय महिला गंभीर जखमी झाली. ही दुर्घटना गुरुवारी सकाळी साडेदहा वाजेच्या दरम्यान घडली. या महिलेचा उपचारादरम्यान गुरुवारी रात्रीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, किनगाव येथील बस स्थानकावर रावेर एसटी आगाराची बऱ्हाणपूर ते सुरत ही बस (क्रमांक एमएच २०/ बीएल ३३९७) घेऊन चालक खेमचंद तेली (वय ४२) हे यावलकडून चोपड्याकडे जात होते. दरम्यान, बस स्थानकावर बस लावत असताना बसमध्ये बसण्याकरिता प्रचंड गर्दी होती. या दरम्यानच गर्दीमध्ये मागच्या चाकात कमलबाई रामराव अंडाईत (रा. अहमदाबाद, गुजरात) या अडकल्या आणि त्यांच्या दोन्ही पायांवरून बसचे मागील चाक गेले. या अपघातामध्ये त्यांच्या दोन्ही पायांना जबर दुखापत झाली. घटनास्थळी तातडीने बाजार समितीचे उपसभापती बबलू कोळी, पंचायत समितीचे माजी सदस्य प्रशांत पाटील, रवींद्र ठाकूर, काँग्रेसचे बशीर तडवी, पिना कोळी यांच्यासह नागरिकांनी धाव घेतली व तातडीने महिलेला उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. अपघातात जखमी झालेल्या या महिलेला तातडीने उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात नेण्यात आले. त्या ठिकाणी उपचारादरम्यान महाविद्यालयाच्या रुग्णालयात नेण्यात आले. त्या ठिकाणी उपचारादरम्यान होती. अपघाताची माहिती मिळतात परिवहन मंडळाचे पथक, पोलिसांचे पथक किनगावला दाखल झाले. पंचनामा करून यावल आगारात बस लावण्यात आली आहे.
या अपघाताच्या गुन्ह्याची नोंद रात्री उशिरा करण्यात आली आहे. अपघाताची माहिती मिळताच यावल पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी उमेश महाजन हे घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून वाहन यावल एसटी आगारात लावण्यात आले आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत असून किनगाव बस स्थानकावर प्रचंड गर्दी जमा झाली होती.