पाचोरा : प्रतिनिधी
नगरदेवळा शहरात अंगणात खेळत असताना सात वर्षीय चिमुकलीचा सर्पदंशाने मृत्यू झाला. ही घटना बुधवारी घडली. मृत चिमुकलीचे नाव काव्या राहुल मणियार (७) असे आहे. ती पहिलीत होती.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी शाळेतून घरी आल्यानंतर अंगणात भावंडांसोबत खेळत होती. दरम्यान, सर्पदंश झाल्याने तिला नातेवाइकांनी तातडीने भडगाव येथील रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, तिचा मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी बारा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने मणियार कुटुंबावर शोककळा पसरली आहे.


