• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

प्रियकराचा थरार : आईच्या घरासमोर ठेवला प्रेयसीचा मृतदेह

editor desk by editor desk
September 12, 2024
in क्राईम, राज्य, राष्ट्रीय
0
प्रियकराचा थरार : आईच्या घरासमोर ठेवला प्रेयसीचा मृतदेह

पुणे : वृत्तसंस्था

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रेयसीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर प्रेयसीचा मृतदेह रिक्षात तिच्या आईच्या घरासमोर ठेवल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी सकाळी काळेवाडी स्मशानभूमीजवळ उघडकीस आला. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी प्रियकराचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवानी सोमनाथ सुपेकर असे खून झालेल्या प्रेयसीचे नाव आहे. विनायक अनिल आवळे असे पसार झालेल्या आरोपी प्रियकराचे नाव आहे. शिवानी हिच्या पतीचे २०१८ मध्ये निधन झाले. शिवानीची आई काळेवाडी स्मशानभूमीजवळ राहते. तर संशयित आरोपी आवळे हा विवाहित असून तो पिंपरीत वास्तव्यास आहे. त्याला २० वर्षांचा एक मुलगा आणि मुलगी आहे. गेल्या दोन वर्षांपासून विनायक आणि शिवानी हे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये राहत होते. मंगळवारी त्यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. त्या वादातून विनायक याने मध्यरात्री बारा ते पहाटे तीन यादरम्यान शिवानीचा गळा आवळून खून केला.

खून केल्यानंतर शिवानीचा मृतदेह रिक्षात ठेवून त्यावर चादर टाकली. त्यानंतर रिक्षा तिच्या आईच्या घरासमोर पार्क केली. बुधवारी सकाळी आठच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र कुराडे, वाकड ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हाटकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी रिक्षा क्रमांकावरून मालकाचा शोध घेतला. त्याने ती रिक्षा आवळे याला भाड्याने दिल्याचे समोर आले. दरम्यान, घटनेनंतर आरोपी आवळे हा पसार झाला असून त्याचा शोध सुरू असल्याचे वाकड पोलिसांनी सांगितले.

Previous Post

संतापजनक : नग्न फोटो, व्हिडीओ व्हायरलची धमकी, तरुणीवर अत्याचार !

Next Post

झिका विषाणूंने काढले राज्यात डोकेवर

Next Post
झिका विषाणूंने काढले राज्यात डोकेवर

झिका विषाणूंने काढले राज्यात डोकेवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘त्या’ शेतकऱ्यांच्या कुटुंबांना १० लाखांची मदत करा : विरोधी पक्षनेते आक्रमक !
राजकारण

‘त्या’ शेतकऱ्यांच्या कुटुंबांना १० लाखांची मदत करा : विरोधी पक्षनेते आक्रमक !

July 2, 2025
पहिल्या नोकरीवर मिळणार 15 हजार रुपये ; केंद्र सरकारचा निर्णय !
राजकारण

पहिल्या नोकरीवर मिळणार 15 हजार रुपये ; केंद्र सरकारचा निर्णय !

July 2, 2025
“जो माणूस स्वतः महिलांना त्रास देतो ;  अंजली दमानिया यांचे ट्वीट !
राजकारण

“जो माणूस स्वतः महिलांना त्रास देतो ; अंजली दमानिया यांचे ट्वीट !

July 2, 2025
ठाकरेंनी स्वतःच्या मुलांना स्कॉटिश स्कूलमध्ये शिकवायचे ; मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरेंनी स्वतःच्या मुलांना स्कॉटिश स्कूलमध्ये शिकवायचे ; मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल !

July 2, 2025
तिघांनी घातली पोलिसांशी हुज्जत : भडगावात गुन्हा दाखल !
Uncategorized

तिघांनी घातली पोलिसांशी हुज्जत : भडगावात गुन्हा दाखल !

July 2, 2025
धरणगावनजीक गुरांना खाली उतरवून वाहनच टाकले जाळून !
अमळनेर

अमळनेरात देहविक्री करणाऱ्या महिला आणि ग्राहकांना अटक !

July 2, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group