जामनेर प्रतिनिधी । शहरातील आयडीबीआय बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री गॅस कटरने कापून सुमारे १२ लाख ७८ हजारांची रोकड लांबविली आहे.चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील पाचोरा रोडवर असलेल्या आयडीबीआय बँक एटीएम रात्रीच्यावेळी चोरट्यांनी कटरच्या साहाय्याने फोडले. बुधवार २६ जानेवारी रोजी मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास हे एटीएम फोडले आहे. अवघ्या १५ मिनीटात एटीएम मधील पैसे चोरून नेले. ही माहिती मिळताच पाचोरा उपविभागीय अधिकारी भारत काकडे, पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्यात आला. सदर घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. सदर या बँकेच्या एटीएम जवळ कोणते प्रकारे सुरक्षारक्षक नसल्यामुळे एटीएममध्ये चोरी झाल्याची चर्चा नागरिकात पाहायला मिळाली होती. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण शिंदे करीत आहे.