Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तीन तरुण जागीच ठार, पाच जण गंभीर ; मध्यरात्री झाला भीषण अपघात !
    क्राईम

    तीन तरुण जागीच ठार, पाच जण गंभीर ; मध्यरात्री झाला भीषण अपघात !

    editor deskBy editor deskSeptember 11, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    कोल्हापूर : वृत्तसंस्था

    जिल्ह्यतील राधानगरी तालुक्यात झालेल्या एका भीषण अपघाताची मोठी घटना घडली आहे. राधानगरी तालुक्यातील सरवडे येथे भीषण अपघात झाला असून एकाच गावातील तीन तरुण जागीच ठार झाले आहेत. बोलेरो आणि ट्रकची जोरदार धडक बसली आणि त्यामुळे अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी झाले आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, निपाणी देवगड राज्य महामार्गावर सरवडे-मांगेवाडी दरम्यान ट्रक आणि बोलोरो गाडीची धडक होऊन भीषण अपघात झाला. अपघातात सोळांकुर येथील तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला. तर पाच जण गंभीर झाले आहेत. भीषण अपघातात सोळांकुर गावातील शुभम चंद्रकांत धावरे (28), आकाश आनंदा परीट (23) आणि रोहन संभाजी लोहार (24) या तीन युवकांचा मृत्यू झाला. तर ऋत्विक राजेंद्र पाटील, भरत धनाजी पाटील, सौरभ सुरेश तेली आणि संभाजी लोहार हे चार जण गंभीर जखमी झाले आहेत. 11 सप्टेंबरला मध्यरात्रीच्या सुमारास सरवडे येथील नदीच्या पुलाजवळ एका बुलेरो गाडीला ट्रकनं धडक दिली. या धडकेत शुभम धावरे, आकाश परीट आणि रोहन लोहार एकाच गावातील तिन्ही तरूण जागीच ठार झाले. तर ऋत्विक पाटील, भरत पाटील, सौरभ तेली आणि संभाजी लोहार हे चौघे गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    भीषण अपघातामुळं ऐन गणेशोत्सवात सोळंकूर गावावर शोककळा पसरली आहे. या अपघातानंतर अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात ट्रक ड्रायव्हरनं भरधाव गाडी चालवत अपघात केला. अपघातानंतर अपघातग्रस्तांना कोणतीही मदत न करता त्यानं घटनास्थळावरुन पळ काढल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    विद्यापीठ व महाविद्यालयात दर्जेदार प्राध्यापकांसाठी मोठी भरती मोहीम

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.