Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मोठी बातमी : शिमल्यात वातावरण तापले : हिंदू संघटना रस्त्यावर उतरल्या
    क्राईम

    मोठी बातमी : शिमल्यात वातावरण तापले : हिंदू संघटना रस्त्यावर उतरल्या

    editor deskBy editor deskSeptember 11, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    देशातील हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथे बेकायदेशीर मशिदी प्रकरणावरून आज 11 सप्टेंबर रोजी हिंदू संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. हिंदू संघटना बेकायदा बांधकाम पाडण्याची मागणी करत आहेत. आंदोलक संजौलीत पोहोचू नयेत यासाठी शिमला पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावले आहेत. आंदोलक बॅरिकेड तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिस लाठीचार्ज करून आंदोलकांचा पाठलाग करत आहेत.

    शिमल्याच्या ढाली भाजी मार्केट आणि बोगद्यादरम्यान शेकडो आंदोलक उपस्थित आहेत. या बोगद्यातून मशिदीकडे जाण्याचा मार्ग आहे. आंदोलकांनी रस्त्यावरच हनुमान चालिसाचे पठण केले. त्यामुळे संजौली-ढाळी रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे. संजौली येथे पोलिसांनी हिंदू जागरण मंचचे नेते कमल गौतम यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या डझनभर नेत्यांना अटक करण्यात आल्याचा दावा हिंदू संघटनांनी केला आहे. ढाली बोगद्याजवळ वाहतूक बंद करण्यात आली आहे.

    डीसी अनुपम कश्यप यांनी संजौलीमध्ये कलम १६३ लागू केले आहे. या अंतर्गत सकाळी 7 ते रात्री 11.59 या वेळेत 5 किंवा त्याहून अधिक लोकांना एकत्र येण्याची किंवा शस्त्र बाळगण्याची परवानगी नाही. संजौलीत शांतता राखण्यासाठी पोलिसांनी मंगळवारी रात्री फ्लॅग मार्चही काढला होता. सरकारी व खाजगी कार्यालये, शाळा, बाजारपेठा पूर्ण उघडी राहतील. कोणत्याही व्यक्तीला आंदोलन करण्याची परवानगी नाही. लाऊडस्पीकरच्या वापरावरही बंदी घालण्यात आली आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    विद्यापीठ व महाविद्यालयात दर्जेदार प्राध्यापकांसाठी मोठी भरती मोहीम

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.