• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

बापरे : भिंत अंगावर पडल्याने उपसरपंचाचा दुर्देवी मृत्यू

editor desk by editor desk
September 11, 2024
in क्राईम, जळगाव, पाचोरा
0
बापरे : भिंत अंगावर पडल्याने उपसरपंचाचा दुर्देवी मृत्यू

पाचोरा : प्रतिनिधी

पाचोरा शहरात सुरु असलेल्या बांधकामाची भिंत अंगावर पडल्याने तालुक्यातील भातखंडे खुर्द येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच तथा बांधकाम कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. रविवारी झालेल्या या अपघातात उपसरपंच हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र मंगळवार १० सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्यासुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील भातखंडे खुर्द येथील विलास रतीलाल कुमावत (वय ३९) हे येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच पदाची जबाबदारी सांभाळत स्वतः बांधकाम गवंडी काम करुन उदरनिर्वाह चालवित होते. रविवार दि. ८ सप्टेंबर रोजी सकाळी पाचोरा शहरातील भडगाव रोडवर बांधकामावर गेलेल्या विलास कुमावत यांच्या अंगावर बांधकामाची भिंत कोसळली.या अपघातात विलास कुमावत हे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दोन दिवस मृत्युशी झुंज देत असतानाच विलास कुमावत यांचा उपचारादरम्यान मंगळवार १० सप्टेंबर रोजी सकाळी ६:३० वाजता दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत विलास कुमावत यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. अत्यंत हसमुख व शांत स्वभावाचे विलास कुमावत यांच्या अकस्मात मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे.

Previous Post

२३० फूट उंचीच्या टावरवर चढून एकाने घेतला गळफास !

Next Post

दोन लाख आणले नाही म्हणून विवाहितेचा जीव घेण्याचा प्रयत्न : विवाहितेचा मृत्यू

Next Post
दोन लाख आणले नाही म्हणून विवाहितेचा जीव घेण्याचा प्रयत्न : विवाहितेचा मृत्यू

दोन लाख आणले नाही म्हणून विवाहितेचा जीव घेण्याचा प्रयत्न : विवाहितेचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !
राजकारण

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !

July 1, 2025
राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !
क्राईम

राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !

July 1, 2025
वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !
जळगाव

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !

July 1, 2025
गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group