• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेला शब्द पाळला ; म्हसावद येथे 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयास शासनाची मंजुरी !

3452.14 लक्ष रक्कमेच्या अंदाजपत्रक व आराखड्यास प्रशासकीय मान्यता ; परिसरातील रुग्णांची होणार सोय !

editor desk by editor desk
September 10, 2024
in जळगाव, राज्य, सामाजिक
0
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेला शब्द पाळला ; म्हसावद येथे 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयास शासनाची मंजुरी !

जळगाव : प्रतिनिधी

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेला शब्द पाळल्याचा प्रत्यय पुन्हा एकदा मतदार संघातील नागरिकांना आला आहे. तालुक्यातील म्हसावद येथे 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय बांधकामासाठी शासनाने मंजुरी दिली आहे. यामुळे आता म्हसावदसह परिसरातील रुग्णांची मोठी सोय होणार आहे.

म्हसावदसह परिसरातील रुग्णांचे शासकीय रूग्णालया अभावी मोठी गैरसोय होत होती. याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शब्द दिला होता की, म्हसावद येथे ग्रामीण रुग्णालय उभारण्यात येईल. त्यानुसार गुलाबभाऊंनी आपला शब्द पाळला असून म्हसावद येथे 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय मुख्य इमारत व निवासस्थान बांधकामासाठी 3452.14 लक्ष रुपये एवढ्या रक्कमेच्या अंदाजपत्रक व आराखड्यास प्रशासकीय मान्यता शासनाकडून मिळवून आणली आहे.

म्हसावद येथील ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालयाची मुख्य इमारत व निवासस्थान बांधकामाचे अंदाजपत्रक सन २०२२-२३ च्या दरसूचीवर आधारित आहे. या अंदाजपत्रकात प्रस्तावित इमारतीपैकी रुग्णालय इमारत (G+१) अशी प्रस्तावित असून त्याचे क्षेत्रफळ 4901.59 चौ.मी. इतके आहे. तसेच निवासस्थाने इमारत यामध्ये टाईप ४ (२ निवासस्थाने) (क्षेत्रफळ २४०.२४ चौ.मी.), टाईप ३ (४ निवासस्थाने) (क्षेत्रफळ ३१२.०० चौ.मी.), टाईप २ (८ निवासस्थाने) (क्षेत्रफळ ५४९.१२ चौ. मी.), टाईप १ (१५ निवासस्थाने) (क्षेत्रफळ ७९५.६० चौ. मी.) याप्रमाणे निवासस्थान इमारतींचे एकुण क्षेत्रफळ १८९६.९६ चौ.मी. इतके आहे.

या इमारतीचे एकूण क्षेत्रफळ ६७९८.५५ चौ.मी. असून बांधकामाचा दर रु. २८००० प्रति चौ. मी. आहे. उक्त बांधकामाची कार्यान्वयीन यंत्रणा सार्वजनिक बांधकाम विभाग आहे. या अंदाजपत्रकामध्ये विद्युतीकरण, पाणी पुरवठा व मलः निस्सारण, आग प्रतिबंधक, अंतर्गत रस्ता, फर्निचर, पार्कीग, भू- विकास, लिप्ट, वाताकुलीत यंत्रणा इ. साठी तरतूद करण्यात आली असून सोबत जोडण्यात आलेल्या Recapitulation sheet प्रमाणे इमारत बांधकामाच्या रु. ३४५२.१४ लक्ष किंमतीच्या, अंदाजपत्रक व आराखड्यांना अटी व शर्तीच्या अधिन राहून शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

Previous Post

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. नलीन महाजन

Next Post

मोठी बातमी : बावनकुळेंच्या मुलाच्या चारचाकी गाडीची पाच गाड्यांना धडक

Next Post
मोठी बातमी : बावनकुळेंच्या मुलाच्या चारचाकी गाडीची पाच गाड्यांना धडक

मोठी बातमी : बावनकुळेंच्या मुलाच्या चारचाकी गाडीची पाच गाड्यांना धडक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group