Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ते मध्येच अशी शस्त्रे टाकू शकत नाहीत ; मंत्री भुजबळ
    राजकारण

    ते मध्येच अशी शस्त्रे टाकू शकत नाहीत ; मंत्री भुजबळ

    editor deskBy editor deskSeptember 9, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक न लढवण्याचे संकेत दिलेत. त्यावर आता मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार आमच्या ग्रुपचे कॅप्टन असून, ते मध्येच अशी शस्त्रे टाकू शकत नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे.

    अजित पवार यांनी रविवारी बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार नसल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर राष्ट्रवादीच्या गोटात एकच खळबळ माजली होती. मंत्री छगन भुजबळ यांना सोमवारी याविषयी छेडले असता त्यांनी अजित पवार मध्येच अशी शस्त्रे टाकू शकत नसल्याचे ठाम व्यक्त केले. छगन भुजबळ म्हणाले की, अजित पवार हे आमच्या ग्रुपचे कॅप्टन आहेत. ते निश्चितच निवडणूक लढवतील. त्यांना मध्येच अशी शस्त्रे टाकता येणार नाहीत. लोकसभा निवडणुकीत जे झाले ती व्यथा त्यांनी मांडली आहे. मी स्वतः 78 वर्षांचा आहे. मग मला ते लढायला का सांगतात? वय आहे ते तो काही मुद्दा नाही.

    छगन भुजबळ यांनी यावेळी शिवसेनेने अर्थखात्यावर व्यक्त केलेल्या नाराजीवरही भाष्य केले. ते म्हणाले, सरकार सर्वांचे पैसे देईल. पण त्यासाठी भांडवल लागते. हे भांडवल जसजसे जमा होईल तसतसे दिले जाईल. उशीर होणे हे काही नवे नाही. काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळातही 3-3 वर्षे उशीर होत होता. प्राधान्य कशाला हे या प्रकरणी ठरवले जाते. त्यामुळे महायुतीच्या तिन्ही घटकांना आगामी निवडणुकीत चांगले यश मिळवायचे असेल तर त्यांनी असे एकमेकांवर विधाने करू नये. विरोधकांना खाद्य पुरवू नये.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    विद्यापीठ व महाविद्यालयात दर्जेदार प्राध्यापकांसाठी मोठी भरती मोहीम

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.