नवी दिल्ली वृत्तसंस्था । भारतीय तटरक्षक दलात ८० जागांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. देशसेवा करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी ही चांगली संधी आहे. इंडियन कोस्टगार्डनं त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर भरतीबाबत नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे.
भारतीय तटरक्षक दलामध्ये (आयसीजी) एकूण ८० जागांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया २२ जानेवारीपासून सुरु झाली आहे. भारतीय तटरक्षक दलाच्या नोटिफिकेशननुसार इंजिन ड्रायव्हर, सारंग लास्कर, स्टोरअर कीपर, सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर, फायरमन, फिटर, स्प्रे पेंटर, मेकॅनिकल, एमटीएस आणि लेबर, शीट मेटल वर्कर आणि इलेक्ट्रिकल फिटर या पदांसाठी भरती होणार आहे. भारतीय तटरक्षक दलाच्या या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचं शुल्क भरावं लागणार नाही.
अश्या राहणार जागा
इंजिन ड्रायव्हर (08), सारंग लास्कर (03), स्टोरअर कीपर (04), सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर (24), फायरमन (06), फिटर (06), स्प्रे पेंटर (01), मेकॅनिकल (6), एमटीएस (19) आणि लेबर (1) शीट मेटल वर्कर (01) आणि इलेक्ट्रिकल फिटर (01)
तरी तातडीने इच्छुक उमेदवारांनी तातडीने अर्ज करावे.