जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात ४८९ कोरोना रूग्ण आढळून आले आहे. तर ३४९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी दिली आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत एकुण १ लाख ४८ हजार ७१८ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४२ हजार ५६५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज जळगाव शहर-८३, जळगाव ग्रामीण- २८, भुसावळ-८२, अमळनेर-७५, चोपडा-६५, पाचोरा-२०, भडगाव-१५, धरणगाव-०, यावल-६, एरंडोल-२०, जामनेर-५१, रावेर-१, पारोळा-०, चाळीसगाव-२९, मुक्ताईनगर-१, बोदवड-११ आणि इतर जिल्ह्यातीन २ असे एकुण ४८९ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे.
जिल्ह्यात सध्या ३ हजार ५६९ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज एका बाधित रूग्णाचा मृत्यू झाला आहे. आता २ हजार ५८४ जणांचा एकुण मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी दिली आहे.