• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

रावेर पोलीसांची मोठी कारवाई : घरफोडीच्या गुन्ह्यातील फरार चोरट्यांना अटक !

editor desk by editor desk
September 8, 2024
in क्राईम, जळगाव, रावेर
0
रावेर पोलीसांची मोठी कारवाई : घरफोडीच्या गुन्ह्यातील फरार चोरट्यांना अटक !

रावेर : प्रतिनिधी

शहरात घरफोडी करणाऱ्या दोन संशयित आरोपींना रावेर पोलीसांनी अटक केली असून त्यांच्याकडून चोरी करण्याचे साहित्य, सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकुण ७८ हजार ३६० रूपयांचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांवर रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रावेर शहरातील श्रीकृष्ण नगरात प्रवीण सिताराम महाजन (वय ३४) यांचे बंद घर फोडून शुक्रवारी ६ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली होती. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सुरू असतांना घरफोडी करणारे चोरटे हे रावेर व सावदा रस्त्यावरून जात असल्याची गोपनिय माहिती रावेर पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने शनिवारी ७ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता गैबन शहा बाबांच्या दर्ग्याच्या टेकडीखाली सापळा रचून गोलूसिंग नशीबसिंग पटवा (वय २०, रा.बडवणी जिल्हा) आणि सुनीलसिंग केवलसिंग बरनाल (वय २६, रा.धार जि मध्यप्रदेश) यांना अटक करण्यात आली.

त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी घरफोडीची कबुली दिली आहे. याप्रकरणी दोघांवर रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, चोरी करण्याचे साहित्य, चोरी करण्याचे साहित्य, चांदीचे पैंजण असा एकुण ७८ हजार ३६० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विशाल जयस्वाल, उपनिरीक्षक तुषार पाटील, घनश्याम तांबे, हेड कॉन्स्टेबल ईश्वर चव्हाण, सचिन घुगे, सुकेश तडवी, विकारोद्दिन शेख, अमोल जाधव, विशाल पाटील, महेश मोगरे, प्रमोद पाटील यांनी केली आहे.

Previous Post

जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात दोन पोलीस हवलदारामध्ये फ्रिस्टाइल ?

Next Post

श्री गोविंद महाराज यांच्या वरची श्रद्धा व निष्ठा आजपण कायम ; पालकमंत्री गुलाबराव पाटील

Next Post
श्री गोविंद महाराज यांच्या वरची श्रद्धा व निष्ठा आजपण कायम ; पालकमंत्री गुलाबराव पाटील

श्री गोविंद महाराज यांच्या वरची श्रद्धा व निष्ठा आजपण कायम ; पालकमंत्री गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group